Home /News /sport /

ENG vs NZ : रूट-बेयरस्टोची टेस्टमध्ये टी-20 स्टाईल, इंग्लंडने किवींना चिरडलं

ENG vs NZ : रूट-बेयरस्टोची टेस्टमध्ये टी-20 स्टाईल, इंग्लंडने किवींना चिरडलं

जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) नाबाद अर्धशतकांमउेल इंग्लंडने तिसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand 3rd Test) पाचव्या दिवशी 7 विकेटने पराभव केला.

    मुंबई, 27 जून : जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) नाबाद अर्धशतकांमउेल इंग्लंडने तिसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा (England vs New Zealand 3rd Test) पाचव्या दिवशी 7 विकेटने पराभव केला. याचसोबत इंग्लंडने 3 टेस्ट मॅचची ही सीरिज 3-0 ने जिंकली आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात झालेल्या टेस्ट सीरिजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये 329 रन केले, यानंतर इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 360 रन करता आले. न्यूझीलंडची दुसरी इनिंग 326 रनवर संपुष्टात आली, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 296 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान इंग्लंडने पाचव्या दिवशी 3 विकेट गमावून पार केलं. 15.2 ओव्हरमध्येच विजय इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी 113 रनची गरज होती आणि त्यांच्या 8 विकेट शिल्लक होत्या. पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 15.2 ओव्हरमध्येच मॅच खिशात टाकली. जॉनी बेयरस्टोने ऑफ स्पिनर मायकल ब्रेसवेलला सिक्स मारून मॅच संपवली. जो रूट आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात चौथ्या विकेटसाठी 111 रनची नाबाद पार्टनरशीप झाली. जो रूटने ओली पोपसोबत तिसऱ्या विकेटसाठी 134 रनची पार्टनरशीप केली. इंग्लंडने दिवसाची सुरूवात 2 विकेटवर 183 रन अशी केली. पोपची विकेट गेल्यानंतर इंग्लंडचा स्कोअर 296/3 एवढा झाला. पोपला टीम साऊदीने बोल्ड केलं. 82 रन करून पोप माघारी परतला. जो रूटने 125 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 86 रन केले. बेयरस्टोने 44 बॉलमध्ये 71 रनची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने 9 फोर आणि 3 सिक्स मारल्या. डावखुरा स्पिनर जॅक लिचला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. लिचने दोन्ही इनिंगमध्ये 5-5 विकेट घेतल्या. तर जो रूटला मॅन ऑफ द सीरिज देण्यात आलं. रूटने पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये शतकं केली होती, यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्येही त्याने अर्धशतक केलं. रूटने दिवसाची सुरूवात 55 तर पोपने 81 रनवर केली होती. दिवसाच्या पाचव्याच बॉलला पोप आऊट झाला, पण बेयरस्टोने आक्रमक बॅटिंग केली. 30 बॉलमध्येच त्याने अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून करण्यात आलेलं हे दुसरं सगळ्यात जलद अर्धशतक आहे. बेयरस्टोने पहिल्या इनिंगमध्येही 162 रन केले होते, जेव्हा इंग्लंडची अवस्था 55/6 अशी होती. इंग्लंडने लॉर्ड्समध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये 5 विकेटने विजय मिळवला, यानंतर नॉटिंघममध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी 299 रनच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: England, New zealand

    पुढील बातम्या