IND vs ENG : भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा

IND vs ENG : भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या (India vs England) टीमची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या (India vs England) टीमची घोषणा करण्यात आली आहे. जॉस बटलर आणि जॉनी बेयरस्टो यांची 12 ते 20 मार्च दरम्यान अहमदाबादमध्ये होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. बटलर पहिली टेस्ट झाल्यानंतर इंग्लंडला परतला होता. तर बेयरस्टोला इंग्लंडच्या रोटेशन पॉलिसीनुसार पहिल्या दोन टेस्टसाठी आराम देण्यात आला आहे. इयन मॉर्गन याच्याकडे टी-20 टीमचं नेतृत्व आहे, तर पहिल्या टेस्टमध्ये शतक करणाऱ्या जो रूटची टी-20 टीममध्ये निवड झालेली नाही.

आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या सॅम कुरनलाही इंग्लंडच्या टीममध्ये स्थान मिळालं आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड मर्यादित ओव्हरमध्ये खेळत नाहीत. दुसऱ्या टेस्टआधी दुखापतग्रस्त झालेल्या जोफ्रा आर्चरलाही टी-20 टीममध्ये संधी मिळाली आहे.

इंग्लंडची टीम

इयन मॉर्गन (कर्णधार), मोईल अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसी टोपले, मार्क वुड

टी-20 सीरिजचं वेळापत्रक

12 मार्च- पहिली टी20- अहमदाबाद

14 मार्च- दुसरी टी20- अहमदाबाद

16 मार्च- तिसरी टी20- अहमदाबाद

18 मार्च- चौथी टी20- अहमदाबाद

20 मार्च- पाचवी टी20- अहमदाबाद

Published by: Shreyas
First published: February 12, 2021, 10:47 AM IST

ताज्या बातम्या