Home /News /sport /

क्रीडा विश्वातून आली मोठी बातमी; क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू निघाला कोरोना पॉझिटिव्ह

क्रीडा विश्वातून आली मोठी बातमी; क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू निघाला कोरोना पॉझिटिव्ह

सध्या सामने सुरू असल्याने क्रीडा विश्वातून चिंता व्यक्त केली जात आहे.

    हंबनटोटा, 04 जानेवारी: श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेल्या इंग्लंड (England) क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen ali) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Possitive) झाल्याचं आढळून आलं आहे. मोईन अली काल आपल्या संघासोबत श्रीलंकेला पोहोचला होता. तेव्हा त्याची PCR चाचणी घेण्यात आली. संबंधित माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्वतः दिली आहे. सध्या इंग्लंड क्रिकेट संघ श्रीलंका दौर्‍यावर आहे. तिथे इंग्लंड आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दोन कसोटी सामन्यांसाठी मोईन अलीची संघातील भूमिका महत्त्वाची होती. पण मोईन अलीला आता कोरोनाची बाधा झाली असल्यानं त्याच्या ठिकाणी इंग्लड संघात कोण खेळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रविवारी 03 जानेवारी रोजी हंबनटोटाच्या विमानतळावर  इंग्लंडच्या संघाचं आगमन झालं. यानंतर सर्व खेळाडूंची PCR चाचणी घेण्यात आली. या चाचणीत मोईन अलीला कोविड -19 विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. याची पुष्टी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं केली आहे. त्यामुळं मोईन अलीला आता श्रीलंका सरकारच्या विलगीकरणाच्या प्रोटोकॉलनुसार 10 दिवस अलग राहावं लागणार आहे. पूर्ण प्रवासात क्रिक्स वोक्स त्याच्या नजीक बसल्यानं त्यानंही स्वतःला क्वारंटाइन करुन घेतलं आहे. उद्या सकाळी पून्हा एकदा पाहुण्या संघाची PCR चाचणी होणार आहे. त्यानंतरचं हा संघ प्रॅक्टीससाठी मैदानात उतरेल. दोन्ही कसोटी सामन्यांना मुकणार? मोईन अली पहिला कसोटी सामना खेळणार की नाही? हे आत्ताच सांगणं कठिण आहे. पण पुढील दहा दिवस म्हणजेच 13 जानेवारीपर्यंत मोईन अलीला विलगीकरणात राहावं लागणार आहे. तसेच पहिला कसोटी सामना 14 जानेवारीला सुरू होणार आहे. त्यामुळं मोईन अली पहिला सामना खेळणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यानंतर हे दोन्ही संघ 22 ते 26 जानेवारी दरम्यान दुसरा कसोटी  सामना खेळणार आहे. त्यामुळं दुसऱ्या कसोटी सामन्यात मोईल अली खेळण्याची दाट शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या