मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs WI: सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू का बसले गुडघ्यावर?

ENG vs WI: सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू का बसले गुडघ्यावर?

West Indies vs England

West Indies vs England

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या (West Indies vs England) सामन्यात लाजिरवाणी कामगिरी केली. मात्र, क्रिकेट जगतात वेस्ट इंडिजच्या पराभवाकडे दुर्लक्ष करत सामन्यापूर्वी दोन्ही संघानी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 23 ऑक्टोबर : सर्वाधिक दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकलेल्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धच्या (West Indies vs England) सामन्यात लाजिरवाणी कामगिरी केली. मात्र, क्रिकेट जगतात वेस्ट इंडिजच्या पराभवाकडे दुर्लक्ष करत सामन्यापूर्वी दोन्ही संघानी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगला बोलावल्यावर वेस्ट इंडिजचा संघ फक्त 55 रनवर ऑल आऊट झाला.वेस्ट इंडिजच्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 8.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला.

तत्पूर्वी, वेस्ट इंडीज संघातील सलामीवीर फलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आले, त्यावेळी पहिला चेंडू टाकण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू गुडघ्यावर बसले होते. त्यांनी हे वर्णद्वेष विरोधात लढा देण्यासाठी केले होते. यासह त्यांनी वर्णद्वेष विरोधात एकजूट असल्याचा देखील संदेश दिला.

इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला या संदर्भात विचारले असता, खेळाडू या मोहिमेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर बदल घडवून आणण्यासाठी ही मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे.

यापूर्वी देखील वेस्ट संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका सुरू असताना इंग्लंड संघाने ‘ब्लॅक लिव्ह मॅटर्स’ मोहिमेला समर्थन केले होते. तसेच टी-20 वर्ल्ड कप 2021 ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात देखील खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेष विरोधात एकजूट असल्याचा संदेश दिला होता.

हे सर्व दीड वर्षांपूर्वीच सुरू झाले होते, जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात ‘ब्लॅक लिव्ह मॅटर्स’ मोहिमेला सुरुवात झाली होती.

First published:

Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup