ENGvsPAK : इग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक 734 धावांचा पाऊस, पाकिस्तानचा पराभव

इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला 12 धावांनी पराभूत केलं.

News18 Lokmat | Updated On: May 12, 2019 01:21 PM IST

ENGvsPAK : इग्लंडमध्ये रेकॉर्डब्रेक 734 धावांचा पाऊस, पाकिस्तानचा पराभव

लंडन, 12 मे : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी मिळून 734 धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या षटकात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला.

जोस बटलरचे नाबाद शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानसमोर 373 धावांचे लक्ष्य ठेवले. बटलरने 110 तर मॉर्गनने 71 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागिदारी केली. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 7 बाद 361 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून एकूण 734 धावा झाल्या. इंग्लंडमध्ये एका एकदिवसीय सामन्यात झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

इंग्लंकडून बटलर आणि मॉर्गन यांच्याशिवाय जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी खेळी केली. बटलरने 50 चेंडूत शतक केले. त्याने 6 चौकार आणि 9 षटकार मारले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानच्या फखर जमानने 106 चेंडूत 138 धावांची खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने पाकिस्तानला सामना गमवावा लागला. बाबार आझम आणि आसिफ अली यांनी अर्धशतके केली. 48 व्या षटकात पाकिस्तानच्या 6 बाद 347 धावा झाल्या होत्या. शेवटच्या दोन षटकांत त्यांना 27 धावांची गरज होती. 49 व्या षटकात त्यांना फक्त 8 धावा काढता आल्या. यात त्यांचा एक गडी बाद झाला.

शेवटच्या षटकात सर्फराज अहमद मैदानावर होता. त्यांना 19 धावांची आवश्यकता होती. हसन अलीने पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. त्यानंतर वाईडची एक धाव अवांतर मिळाली. पुढच्या चेंडूवर अलीने एक धाव काढली. त्यानंतर सर्फराज अहमदला चार चेंडूत चारच धावा काढता आल्या आणि इंग्लंडने 12 धावांनी सामना जिंकला.

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...