सानियाचा नवरा असा झाला बाद, जगभरात VIDEO VIRAL

सानियाचा नवरा असा झाला बाद, जगभरात VIDEO VIRAL

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी शोएब मलिक बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना हसू आवरलं नाही.

  • Share this:

नॉटिंगहम, 18 मे : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा 3 विकेटने पराभव झाला. या सामन्यासह इंग्लंडने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने 41 धावांची वेगवान खेळी केली. मात्र, तो हिटविकेट बाद झाल्याने संघातील खेळाडू निराश झाले.

मार्क वूडच्या गोलंदाजीवर बॅकफूटवर खेळण्याच्या नादात शोएब मलिक हिट विकेट बाद झाला. 47 व्या षटकातील चौथा चेंडू मार्क वूडने शॉर्ट टाकला. यावेळी बॅकफूट खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शोएब मलिकला आपण खूप मागे सरकल्याचं समजलं नाही आणि बॅटनेच यष्ट्या उडवल्या.पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 340 धावा केल्या. हे आव्हान इंग्लंडने 49.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून बाबर आजमने शतक केले. त्याला फखऱ जमानने 57 धावा करत साथ दिली. फखर जमान नंतर मोहम्मद हाफीजनने 59 धाव केल्या. तर शोएब मलिकने 26 चेंडूत 41 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांत कर्णधार सर्फराज अहमदनेही फटकेबाजी करत 14 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम करनने 4 तर मार्क वुड आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी एक विकेट घेतली. तिसऱ्या सामन्यात दीडशतकी खेळी करणाऱा इमाम उल हकला दुखापतीने रिटायर्ड होऊन परतावं लागलं.

VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2019 01:15 PM IST

ताज्या बातम्या