मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs PAK : सर्वाधिक स्पिन झालेला बॉल म्हणून इतिहासात नोंद, इमामला झेपलाच नाही, VIDEO

ENG vs PAK : सर्वाधिक स्पिन झालेला बॉल म्हणून इतिहासात नोंद, इमामला झेपलाच नाही, VIDEO

इंग्लंडचा स्पिनर मॅट पार्किनसन (Mat Parkinson) याला अनेक जण भविष्यातला सर्वोत्तम स्पिनर म्हणून पाहत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (England vs Pakistan) तिसऱ्या वनडेमध्ये त्याने याचीच झलक दाखवली.

  • Published by:  Shreyas

लंडन, 14 जुलै : इंग्लंडचा स्पिनर मॅट पार्किनसन (Mat Parkinson) याला अनेक जण भविष्यातला सर्वोत्तम स्पिनर म्हणून पाहत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (England vs Pakistan) तिसऱ्या वनडेमध्ये त्याने याचीच झलक दाखवली. पार्किनसनने इमाम उल हकला (Imam Ul Haq) शेन वॉर्न (Shane Warne) सारखा करिश्माई बॉल टाकला. इमाम उल हक हा बॉल म्हणजे फोर मारायची संधी म्हणून पाहत होता, पण पार्किनसनने फेकलेल्या या जाळ्यात तो अडकला आणि बोल्ड झाला.

अनेकांनी पार्किनसनच्या या बॉलची तुलना शेन वॉर्नच्या बॉलिंगशी केली. एजबॅस्टनच्या विकेटवर पाकिस्तानचा स्कोअर 113 रनवर एक विकेट असा होता. बॉलरना कोणतीही मदत मिळत नसताना पार्किनसनने जादुई बॉल टाकला. पार्किनसनने टाकलेला हा बॉल म्हणजे दशकातला सर्वोत्तम असल्याची प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली.

56 रनवर खेळणाऱ्या इमाम उल हकला पार्किनसनने सहाव्या स्टम्पच्या आसपास बॉल टाकला. या बॉलवर हकन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. बॉलची लाईन ऍण्ड लेन्थ पाहून इमाम खूश झाला आणि त्याने बाऊंड्री मारण्याचा प्रयत्न केला, पण हा ड्राईव्ह त्याने शरिरापासून दूर राहून मारण्याचा प्रयत्न केला. पुढच्याच क्षणाला जे झालं ते पाहून फक्त इमामच नाही तर मैदानातला प्रत्येक जण हैराण झाला.

पार्किनसनने सहाव्या स्टम्पवर टाकलेला बॉल मिडल स्टम्पला जाऊन लागला. क्रिकविजने दिलेल्या वृत्तानुसार हा बॉल वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक वळलेला बॉल ठरला. या बॉलने तब्बल 12.1 डिग्री वळण घेतलं. 2005 सालच्या ऍशेसमध्ये शेन वॉर्ननेही अशाच प्रकारे बॉल टाकला होता, ज्यामुळे एन्ड्र्यू स्ट्राऊस बोल्ड झाला होता.

First published:

Tags: Cricket, England, Pakistan