मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs PAK : इंग्लंडच्या 'बी' टीमसमोरही पाकिस्तानची लाजिरवाणी कामगिरी

ENG vs PAK : इंग्लंडच्या 'बी' टीमसमोरही पाकिस्तानची लाजिरवाणी कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 141 रनवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडच्या बी टीमसमोर पाकिस्तानची अशी लाजिरवाणी अवस्था झाल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

  • Published by:  Shreyas

कार्डिफ, 8 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 141 रनवर ऑल आऊट झाला आहे. इंग्लंडच्या बी टीमसमोर पाकिस्तानची अशी लाजिरवाणी अवस्था झाल्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानविरुद्धची सीरिज सुरु होण्याच्या तीन दिवस आधीच इंग्लंड टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यातले 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचे सदस्य होते, त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या क्षणी संपूर्ण टीमच बदलावी लागली. 18 जणांच्या या टीममधल्या 9 खेळाडूंची पहिल्यांदाच इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली.

इंग्लंडच्या एवढ्या नवख्या टीमसमोर पाकिस्तानची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मॅचच्या पहिल्याच बॉलला इमाम उल हक (Imam Ul Haq) शून्य रनवर बाद झाला, तर कर्णधार बाबर आझमही (Babar Azam) 2 बॉलमध्ये शून्य रन करून माघारी परतला. पाकिस्तानकडून ओपनर फखर झमानने (Fakhar Zaman) सर्वाधिक 47 रन केले, तर शादाब खान 30 रनवर आऊट झाला.

इंग्लंडकडून सकीब महमूदने (Sakib Mahamood) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर क्रेग ओव्हरटन आणि मॅथ्यू पार्किनसन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. लुईस ग्रेगोरीला एक विकेट घेण्यात यश आलं.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. यानंतर भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. भारताविरुद्धच्या सीरिजआधी खेळाडू कोरोनामुक्त होऊन फिट होतील, अशी अपेक्षा इंग्लंडला आहे.

First published:

Tags: Cricket, England, Pakistan