VIDEO : चौथ्या सामन्यातही धावांचा पाऊस, इंग्लंडने सामन्यासह मालिका जिंकली

VIDEO : चौथ्या सामन्यातही धावांचा पाऊस, इंग्लंडने सामन्यासह मालिका जिंकली

पाकिस्तानच्या बाबर आजमची शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडची मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी.

  • Share this:

नॉटिंगहम, 18 मे : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या 5 एकदिवसीय सामन्यातील चौथ्या सामन्यातही धावांचा पाऊस पडला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 340 धावा केल्या. हे आव्हान इंग्लंडने 49.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून बाबर आजमने शतक केले. त्याला फखऱ जमानने 57 धावा करत साथ दिली. फखर जमान नंतर मोहम्मद हाफीजनने 59 धाव केल्या. तर शोएब मलिकने 26 चेंडूत 41 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांत कर्णधार सर्फराज अहमदनेही फटकेबाजी करत 14 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. इंग्लंडकडून टॉम करनने 4 तर मार्क वुड आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी एक विकेट घेतली. तिसऱ्या सामन्यात दीडशतकी खेळी करणाऱा इमाम उल हकला दुखापतीने रिटायर्ड होऊन परतावं लागलं.

पाकिस्तानने दिलेल्या 341 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉयने 89 चेंडूत 114 धावा केल्या. तर बेन स्टोक्सने 71 धावा, जेम्स विन्सने 43 आणि जो रूटने 36 धावांची खेळी केली. कर्णधार जोस बटलर आणि मोइन अली दोघेही शून्यावर बाद झाले. गोलंदाज टॉम करनने गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल केली. त्याने 30 चेंडूत 31 धावा केल्या. पाकिस्तानच्या इमाद वसीम आणि मोहम्मद हसनैन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण

First published: May 18, 2019, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading