ENG vs NZ: दिवसाच्या पहिल्याच बॉलवर इंग्लंड ऑलआऊट, न्यूझीलंडचा दणदणीत विजय, Match Report

ENG vs NZ: दिवसाच्या पहिल्याच बॉलवर इंग्लंड ऑलआऊट, न्यूझीलंडचा दणदणीत विजय, Match Report

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने भारताचं टेन्शन वाढवलं आहे. या मुकाबल्याआधी न्यूझीलंडने इंग्लंडचा (England vs New Zealand) दुसऱ्या टेस्टमध्ये अगदी सहज पराभव केला आहे.

  • Share this:

बर्मिंघम, 13 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने भारताचं टेन्शन वाढवलं आहे. या मुकाबल्याआधी न्यूझीलंडने इंग्लंडचा (England vs New Zealand) दुसऱ्या टेस्टमध्ये अगदी सहज पराभव केला आहे. याचसोबत न्यूझीलंडचा या सीरिजमध्ये 1-0 ने विजय झाला आहे. सीरिजची पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. शेवटच्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 38 रनची गरज होती. हे आव्हान किवींनी दोन विकेट गमावून पूर्ण केलं.

त्याआधी इंग्लंडचा आज दिवसाच्या पहिल्याच बॉलला ऑल आऊट झाला. 122 रनवर इंग्लंडची संपूर्ण टीम माघारी परतल्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 38 रनचं आव्हान मिळालं. किवींकडून मॅट हेन्री (Mat Henry) आणि नील वॅगनरला (Neil Wagner) सर्वाधिक 3-3 विकेट मिळाल्या, तर बोल्ट (Trent Boult) आणि एझाज पटेल (Azaz Patel) याला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्क वूडने (Mark Wood) सर्वाधिक 29 रनची खेळी केली.

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिल्या इनिंगमध्ये 303 रन केले. रोरी बर्न्स आणि लॉरेन्स यांनी प्रत्येकी 81-81 रनची खेळी केली. पहिल्या इनिंगमध्ये बोल्टला सर्वाधिक 4 विकेट घेता आल्या, तर मॅट हेन्रीला 3, एझाज पटेलला 2 आणि नील वॅगनरला एक विकेट घेता आली. न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या इनिंगच्या बॅटिंगमध्ये 388 रन केल्यामुळे त्यांना महत्त्वाची आघाडी मिळाली. किवींकडून विल यंगने 82 आणि डेवॉन कॉनवे-रॉस टेलरने प्रत्येकी 80-80 रन केले.

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आता 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या मुकाबल्याआधी मिळालेला हा विजय न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढवणारा नक्कीच असेल.

Published by: Shreyas
First published: June 13, 2021, 4:29 PM IST

ताज्या बातम्या