Home /News /sport /

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या निकोल्सची विकेट पाहून सचिनही हैराण, तुम्हीही बघा हा VIDEO

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या निकोल्सची विकेट पाहून सचिनही हैराण, तुम्हीही बघा हा VIDEO

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच अशा घटना होतात, ज्याचा कोणी कधी विचारही केला नसेल. असंच काहीसं चित्र इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळालं.

    मुंबई, 24 जून : क्रिकेटच्या मैदानात नेहमीच अशा घटना होतात, ज्याचा कोणी कधी विचारही केला नसेल. असंच काहीसं चित्र इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळालं. न्यूझीलंडचा बॅट्समन हेन्री निकोल्स (Henry Nicholls) कोणतीही चूक न करता आऊट झाला. याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. निकोल्सचा आऊट होण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने या घटनेची तुलना भारतातल्या गली क्रिकेटश केली आहे, जिकडे आयसीसीचे नियम मानले जात नाहीत, तर खेळणाराच स्वत:चे नियम ठरवतो. 'गली क्रिकेटमध्ये आम्ही नॉन स्ट्रायकरला आऊट दिलं असतं,' असं सचिन म्हणाला आहे. कसा आऊट झाला निकोल्स निकोल्सने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह नॉन स्ट्रायकर एण्डला उभ्या असलेल्या डॅरेल मिचेलच्या बॅटला लागला आणि मिड-ऑफच्या दिशेने गेला. तिकडे उभ्या असलेल्या एलेक्स लीसने कॅच पकडला आणि निकोल्सला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. निकोल्स ज्याप्रकारे आऊट झाला ते पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनाही हसू आलं. डॅरेल मिचेलने ठोकलं शतक निकोल्सच्या शॉटला फिल्डरपर्यंत पोहोचण्यात मदत केलेल्या डॅरेल मिचेलने शानदार शतक केलं. मिचेलने 228 बॉलमध्ये 109 रनची खेळी केली. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने 329 रन केले होते. टॉम ब्लंडेलने 122 बॉलमध्ये 7 फोरच्या मदतीने 55 रनची खेळी केली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या