Home /News /sport /

ENG vs NED : इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड 498 रन, 26 सिक्स 36 फोर ठोकत वनडे क्रिकेटमध्ये घडवला इतिहास!

ENG vs NED : इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्ड 498 रन, 26 सिक्स 36 फोर ठोकत वनडे क्रिकेटमध्ये घडवला इतिहास!

वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. नेदरलँडविरुद्धच्या (England vs Netherlands) पहिल्या सामन्यात इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासातला हा सर्वाधिक स्कोअर आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. नेदरलँडविरुद्धच्या (England vs Netherlands) पहिल्या सामन्यात इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासातला हा सर्वाधिक स्कोअर आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडने इनिंगमध्ये तब्बल 26 सिक्स आणि 36 सिक्स ठोकल्या. जवळपास वर्षभराने इंग्लंड वनडे क्रिकेट खेळत आहे, याआधी मागच्यावर्षी ते पाकिस्तानविरुद्ध वनडे सीरिज खेळले होते. 498 रनच्या या वर्ल्ड रेकॉर्ड खेळीमध्ये इंग्लंडकडून तिघांनी शतकं तर एकाने अर्धशतक झळकावलं. आयपीएल 2022 मध्ये धमाका करणाऱ्या जॉस बटलरने (Jos Buttler) 70 बॉलमध्ये नाबाद 162 रनची खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 14 सिक्सचा समावेश होता. याशिवाय फिलिप सॉल्टने (Philip Salt) 93 बॉलमध्ये 122 आणि डेव्हिड मलानने 109 बॉलमध्ये 125 रनची खेळी केली. सॉल्टने 14 फोर आणि 3 सिक्स तर मलानने (David Malan)  9 फोर आणि 3 सिक्स मारल्या. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 300 च्या स्ट्राईक रेटने 22 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यात त्याने 6 फोर आणि 6 सिक्स ठोकले. वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरपैकी पहिले तिन्ही स्कोअर हे आता इंग्लंडच्या नावावर आहेत. मुख्य म्हणजे हे तिन्ही स्कोअर इंग्लंडने मागच्या 6 वर्षांमध्ये केले आहेत. नेदरलँडविरुद्धच्या या स्कोअरआधी इंग्लंडने 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481/6 तर 2016 साली पाकिस्तानविरुद्ध 444/3 एवढा स्कोअर केला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: England

    पुढील बातम्या