चेन्नई सुपरकिंग्ज संघावर पुन्हा एकदा संकट! 300 कोटी प्रकरणी EDकडून होऊ शकते चौकशी

चेन्नई सुपरकिंग्ज संघावर पुन्हा एकदा संकट! 300 कोटी प्रकरणी EDकडून होऊ शकते चौकशी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळं तब्बल 2 वर्ष बंदी घातल्यानंतर 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघानं पुनरागमन केले.

  • Share this:

चेन्नई, 27 ऑगस्ट : स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळं तब्बल 2 वर्ष बंदी घातल्यानंतर 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघानं पुनरागमन केले. 2019च्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई संघाला फायनलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र, आता पुन्हा चेन्नईचा संघ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बिझनेस स्टॅंडर्डनं दिलेल्या माहितीनुसार अंमलबजावणी संचलनालयनं अवैध सावकारी (मनी लॉन्ड्रिंग) तपासात चेन्नई संघानं इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अण्ड फायनॅंशिअर सर्व्हिस कंपनीत (IL&FS) 300 कोटींची गुंतवणूक केली आहे.

2018मध्ये केली होती गुंतवणूक

बिझनेस स्टॅंडर्डनं दिलेल्या बातमीनुसार, 2018मध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. दरम्यान ही गुंतवणूक का करण्यात आली होती, याबाबत अंमलबजावणी संचलनालयन चौकशी करणार आहे. 2018मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघावर आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपामुळं बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं चेन्नई सुपरकिंग्जला 2016 आणि 2017मध्ये आयपीएलमध्ये भाग घेता आला नव्हता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर धोनी पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळत होता.

वाचा-मिताली राजचं करिअर संपवणाऱ्या खेळाडूला BCCIने दिली मोठी जबाबदारी!

या प्रकरणाचा EDकडून होणार तपास

अंमलबजावणी संचलनालयला यांना इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अण्ड फायनॅंशिअर सर्व्हिसने (IL&FS) कंपनीत गुंतवणूक केल्याचे प्रकरण कर्जच्या माहितीमुळं मिळाली. यासंदर्भात EDच्या वतीनं तपास केला जाणार आहे. दरम्यान पुन्हा चेन्नई या गोतावळात अडकली तर, आयपीएल 2020मध्ये त्यांचे खेळणे कठिण जाणार आहे. EDच्या वतीनं या व्यवहाराचा तपास सुरू आहे.

वाचा-DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

चेन्नई सुपरकिंग्ज संघाची होऊ शकते चौकशी

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या फ्रेंचायझीची चौकशी होऊ शकते. EDच्या अधिकाऱ्यांना या गुंतवणूकीत अवैधता आढळल्यास कमीत कमी तीन वेळा चेन्नई संघाची चौकशी होऊ शकते. IL&FSचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात दोषी आहेत. त्यामुळं त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत चेन्नई संघाचे नाव आल्यास त्यांची चौकशी होऊ शकते. EDच्या वतीनं आतापर्यंत चेन्नई संघाशी यासंदर्भात कोणताही संपर्क केलेला नाही.

वाचा-टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading