मालक, व्यवस्थापन, कर्मचारी, माझे सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या उत्साही चाहत्यांना मी मनापासून आभार मानू इच्छितो. तुम्ही सर्वांनी हा हंगाम खास बनवला आहे. आम्ही पुन्हा प्रबळ दाव्याने मैदानात उतरु. असे ट्विटमध्ये रिषभने म्हटले आहे. रिषभ पंत प्रथमच दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. या मोसमात पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल राहत अगदी दिमाखात संघाने प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये दिल्ली संघाला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये केकेआरचा सामना करावा लागला. केकेआरविरुद्ध दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आणि एकाही फलंदाजाला या महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतक करता आले नाही. दिल्लीचा संघ केकेआरला या सामन्यात फक्त 136धावांचे आव्हान देऊ शकला. हे वाचा- T20 वर्ल्डकपवरुन भज्जीने उडवली शोएब अख्तरची खिल्ली, म्हणाला... यानंतर, कोलकाताच्या फलंदाजांसमोर दिल्लीने सुरुवातीला चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शनही केले नाही. सुरुवातीच्या षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने आक्रमकता दाखवली नाही. दिल्ली संघाला पहिल्या विकेटसाठी तब्बल १३ व्या षटकापर्यंत थांबावे लागली होते. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या षटकात दोन गडी बाद करून सामना रोमहर्षक बनवला होता, पण राहुल त्रिपाठीने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून केकेआरला अंतिम फेरीत पोहोचवण्यात यश मिळवले.It ended in heartbreak last night, but I could not be more proud of leading this team of exceptional warriors. We battled hard through the season, and while we may have fallen short on some days, we always gave 100%. pic.twitter.com/IRPGqsmPT0
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 14, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant