• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Team India मधल्या विराट-शास्त्री राज्याचा अस्त, द्रविड कोच, कॅप्टन कोण?

Team India मधल्या विराट-शास्त्री राज्याचा अस्त, द्रविड कोच, कॅप्टन कोण?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातला सामना सुरू असतानाच बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या नव्या कोचची (Team India Coach) घोषणा केली.

  • Share this:
    मुंबई, 3 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातला सामना सुरू असतानाच बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या नव्या कोचची (Team India Coach) घोषणा केली. भारताचा महान खेळाडू राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबरपासून भारतात सुरू होणाऱ्या सीरिजपासून द्रविड नव्या भूमिकेत दिसेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच होताच टीम इंडियामधल्या रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या राज्याचा अस्त झाला आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहलीच्या जोडीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. तसंच काही निच्चांकी क्षणही टीमला पाहायला लागले. रवी शास्त्री कोच असताना भारताने टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात दोनदा तर इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 36 रनवरही ऑल आऊट झाला. रवी शास्त्री कोच असताना भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलही भारताला गमवावी लागली. याशिवाय टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारताची कामगिरी निराशाजनक झाली. नवा कॅप्टन कोण? टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली (Virat Kohli) या फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा फॉर्म बघता विराटला वनडे टीमची कॅप्टन्सीही सोडावी लागू शकते, त्यामुळे या दोन्ही फॉरमॅटमध्ये टीमचा कॅप्टन कोण होणार, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढच्या दोन वर्षांसाठी राहुल द्रविड टीमचा मुख्य प्रशिक्षक असेल. या दोन वर्षांमध्ये 2022 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे. Team India मध्ये द्रविड पर्व! कोच झाल्यानंतर The Wall ची पहिली प्रतिक्रिया
    Published by:Shreyas
    First published: