DC vs SRH : 'हे' आकडे उडवत आहेत दादाची झोप, एक चूक आणि खेळ खल्लास

DC vs SRH : 'हे' आकडे उडवत आहेत दादाची झोप, एक चूक आणि खेळ खल्लास

करो या मरोच्या सामन्यात कोणता संघ मारणार बाजी.

  • Share this:

विशाखापट्टणम, 08 मे : क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात मुंबईवर चेन्नईवर विजय मिळवत, थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळं आज हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात होणाऱ्या सामन्यात जो संघ विजयी होणार, त्याला चेन्नईशी सामना करावा लागणार आहे. दरम्यान दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात जो संघ सामना हरेल, त्या संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. दरम्यान दिल्लीचा संघ 18 गुणांसह प्ले ऑफपर्यंत पोहचली आहे. तर, हैदराबादचा संघ आयपीएलच्या इतिहासतला असा एकमेव संघ आहे जो, 12 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहचला आहे.

दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात 'अशी' लढाई

या दोन्ही संघात आतापर्यंत 14वेळा लढत झाली आहे. यात 9वेळा हैदराबादनं सामना जिंकला आहे. तर, 5 वेळा दिल्लीनं हैदराबादला नमवलं आहे. दरम्यान विशाखापट्टणमच्या मैदानावर या दोन्ही संघांनी केवळ एकच सामना खेळला आहे. यात दिल्लीनं बाजी मारली आहे. त्यामुळं आकडे हैदराबादच्या बाजूनं असल्यामुळं सध्या दिल्ली संघाचा सल्लागार सौरव गांगुलीच्या चिंता वाढल्या आहेत.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

दोन्ही संघाकडं 'हे' मोठे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिखर धवन, ट्रेंट बोल्ट असे मोठे खेळाडू आहेत. तर, हैदराबादचा संघ डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्ट्रो यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरेल. यांच्याशिवाय संघाकडं, मनीष पांडे, केन विल्यमसन, युसूफ पठाण यांसारखे फलंदाज तर, राशिद खान आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे गोलंदाजही आहेत.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या