VIDEO : अरेरे! निवृत्तीनंतर ‘छमिया’सोबत लग्नांमध्ये नाचतोय स्टार क्रिकेटपटू

VIDEO : अरेरे! निवृत्तीनंतर ‘छमिया’सोबत लग्नांमध्ये नाचतोय स्टार क्रिकेटपटू

लवकरच हा क्रिकेटपटू बॉलीवूड सिनेमांमध्येही दिसणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडू एकतर अभिनयाकडे वळतात किंवा प्रशिक्षणाकडे. मात्र पहिल्यांदाच टी-20 क्रिकेट गाजवणारा खेळाडू निवृत्तीनंतर भारतीय लग्नांमध्ये नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून युट्युबवर या व्हिडीओचे चाहतेही बरेच आहे. हा स्टार खेळाडू आहे वेस्ट इंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (डीजे ब्राव्हो).

ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यान हिंदी चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. याआधी ब्राव्होनं चॅम्पियन नावाने गाणे प्रसिध्द केले होते. मुळातच गाण्याची आणि नाचण्याची आवड असलेल्या ब्राव्होचे हे गाणे आजही भारतात प्रसिध्द आहे. दरम्यान सध्या, लग्नाचा सीझन पाहता त्यानं नुकताच भारतीय लग्नांमध्ये वाजले जाईल असे ‘वेडिंग पार्टी सॉन्ग’ रिलीज केले आहे.

वाचा-WhatsApp Callमध्ये झाला मोठा बदल, फोन लावताना दिसणार 'हे' दोन नवे पर्याय

या नव्या गाण्यानं  ब्राव्हो भारतीय स्टार डान्सर शक्ति मोहनसोबत रोमांस करताना दिसत आहे. 'छमिया' म्हणून प्रसिद्ध झालेल्या या गाण्यात ब्राव्हो भारतीय लग्नात मस्ती करताना दिसत आहे. या ब्राव्हो शेरवानी घालून डान्स करतान दिसत आहे.

वाचा-वेळेत मंडपात पोहचला नाही नवरदेव, नवरीनं दुसऱ्याच मुलासोबत साधला मुहूर्त!

डीजे ब्राव्होने यापूर्वीही त्यांची बरीच गाणी लाँच केली आहेत, जी जगभरात खूप पसंत पडली आहेत. ब्राव्हो (डीजे ब्राव्हो) चे चॅम्पियन गाणे अजूनही प्रत्येकाच्या तोंडावर आहे. त्याचबरोबर त्याच्या एशिया गाण्यांनी भारतीय लोकांची मने जिंकली आहेत. गेल्या महिन्यात, तो अबू धाबी येथे टी 10 लीगसाठी मैदानात उतरला.

वाचा-IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

संघात स्थान नसल्यामुळे केली निवृत्तीची घोषणा

ब्राव्हो (डीजे ब्राव्हो) यांनी याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डिसेंबर 2010 पासून त्याला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर शेवटचा कसोटी  सामना 2014मध्ये खेळला होता. तर, शेवटचा टी -20 सामना 2016मध्ये खेळला होता. दरम्यान ब्राव्होला बर्‍याच दिवसांपासून संघातून बाहेर होता, त्यामुळं त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Published by: Priyanka Gawde
First published: December 11, 2019, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading