मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Dwayne Bravo म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले अन् माझ्या हृदयाजवळ...

Dwayne Bravo म्हणतोय, “भारताने मला एक ब्रँड बनवले अन् माझ्या हृदयाजवळ...

Dwayne Bravo

Dwayne Bravo

वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने(Dwayne Bravo) भारताबद्दला मोठे वक्तव्य केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 डिसेंबर: वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने(Dwayne Bravo) नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. ब्राव्हो आयपीएल 2021 (IPL2021)मध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता आणि संघाने विक्रमी चौथ्यांदा विजेतेपदही जिंकले. मात्र, आगामी आयपीएलसाठी(IPL2022) संघाने त्याला डच्चू दिला आहे. पण तो आता एका नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. दरम्यान त्याने, भारताबद्दला मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे भारताचे फॅन्स त्याच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.

ड्वेन ब्रावोने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. क्रिकेट कारकीर्द सुरू असताना त्याने संगीतकार आणि गायक म्हणून देखील एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु, आता तो फॅशन क्षेत्रात देखील आपली नवीन इनिंग खेळायला सज्ज झाला आहे. त्याने ‘डीजेबी 47 फॅशन लेबल’ ला सुरुवात केली आहे. जो येणाऱ्या वर्षात भारतात देखील लॉन्च करण्यात येणार असून ऑनलाईन सर्वांसाठी उपलब्ध असेल.

भारताने मला एक ब्रँड बनवले

यासंदर्भात बोलताना त्याने भारताविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. त्याने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'हे माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मला वाटत नाही की, मी भारताशिवाय ब्रँड बनू शकलो असतो. ही वस्तुस्थिती आहे आणि मला भारताचे आभार मानायचे आहेत. जे माझ्या घरापासून खूप दूर आहे. इथल्या लोकांकडून मला जे प्रेम मिळाले ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. हेच कारण आहे की, जेव्हा मी संगीत किंवा क्रिकेटबद्दल बोलतो त्यात नेहमी भारताचा समावेश असतो.'

तसेच, सीएसके संघाने डच्चू दिल्यानंतर पहिल्यांदाच त्याने यावर प्रतिक्रीया दिला आहे. तो म्हणाला, मी 100 टक्के लिलावासाठी जाईन. मला माहित नाही की मी कोणत्या संघात सामील होऊ शकेन. तसेच, मला सीएसके विकत घेईल की नाही माहिती नाही. मी लिलावात असल्यामुळे मला इतर संघातही घेऊ शकतो. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले.

तसेच, एमएम धोनीबाबत तो म्हणाला की आमच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. त्याने मला माझे करिअर पुढे नेण्यास मदत केली आहे. मी सीएसकेसाठी बराच काळ एकत्र खेळलो आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याने म्हटले.

500 विकेट घेणार बॉलर

ड्वेन ब्राव्हो हा टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 512 सामन्यात 553 विकेट घेतल्या आहेत. T20 मध्ये 500 बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. त्याने 11 वेळा 4 आणि 2 वेळा 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 23 धावांत 5 बळी घेतले. याशिवाय त्याने 6627 धावा केल्या आहेत. 20 अर्धशतके केली आहेत.

First published:

Tags: Cricket