Elec-widget

धोनीच्या खास खेळाडूनं दिले निवृत्ती मागे घेण्याचे संकेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार कमबॅक?

धोनीच्या खास खेळाडूनं दिले निवृत्ती मागे घेण्याचे संकेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार कमबॅक?

धोनीच्या खास खेळाडू निवृत्ती घेणार मागे? पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार कमबॅक?

  • Share this:

चेन्नई, 12 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी निवृत्ती घेतली आहे खरी मात्र अजूनही त्यांना क्रिकेट खेळायचे आहे. युवराज सिंगबाबतही असाच प्रकार घडला. युवीला संघात स्थान मिळाले नाही म्हणून त्यानं निवृत्ती घेतली. आता आणखी एक स्टार खेळाडू आपली निवृत्ती मागे घेत पुन्हा कमबॅक करण्याच्या विचारात आहे.

आयपीएमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा हा खेळाडू आता पुन्हा क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमनं अफगाणिस्तान विरोधात 2-0नं आघाडी घेतली आहे. 2014मध्ये बांगलादेशकडून पराभव स्वीकारल्यानंतर पाच वर्षांनंतर पहिल्यांदा वेस्ट इंडिजनं मालिका जिंकी आहे. वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूनं संघाची खेळी पाहता त्यांचे कौतुक करत पुन्हा संघात सामिल होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अष्टपैलू ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) पुन्हा कमबॅक करायचा आहे. ब्राव्हो आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो.

पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघानं अफगाणिस्तानला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 47 धावांनी मात दिली. यानंतर ब्राव्होनं एक व्हिडीओ टाकत, “वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा मोठा दिवस आहे. संघानं गेल्या पाच वर्षात एकही मालिका जिंकलेली नाही. मात्र अखेर खेळाडूंनी ही कामगिरी करून दाखवली आहे”, असा संदेश दिला. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेतही दिले.

तसेच, ब्राव्होनं, “सध्याच्या संघाला मी शुभेच्छा देतो. पाच वर्ष एकही मालिका जिंकलेली नाही, मात्र या संघाने ते करून दाखवलं. मी वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आहे. मी लवकरच निवृत्तीतून माघार घेण्याची घोषणा करू शकतो. असे आपण सध्या म्हणू शकत नाही की विंडीजचा संघ पुन्हा पहिल्या सारखा झाला आहे पण आता या संघाची सुत्रं बरोबरी हातांमध्ये आहेत”, असेही स्पष्ट केले. ब्राव्हो चेन्नई संघाकडून आणि इतर क्रिकेट लीगमध्येही खेळतो. मात्र ब्राव्होनं याआधीही आयपीएलमध्ये त्याला खेळायला आवडते असे सांगितले होते. त्यामुळं आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी ब्राव्हो सज्ज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 07:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...