द्युती चंदने इंडियन ग्रांप्रीमध्ये पटकावलं सुवर्ण पदक

द्युती चंदने इंडियन ग्रांप्रीमध्ये पटकावलं सुवर्ण पदक

वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी द्युती चंद ही पहिली महिला धावपटू ठरली होती.

  • Share this:

पाटियाला, 17 ऑगस्ट : वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारताची धावतपटू द्युती चंदने पाचव्या इंडिया ग्रांप्री मध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. 23 वर्षीय द्युती चंदनं पाटियाला इथं नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत 11.42 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानं ट्विटरवरून द्युतीनं शर्यत जिंकल्याची माहिती दिली. द्युतीचं तिच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीसुद्धा द्युतीचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

द्युतीनंतर तामिळानाडुच्या अर्चना सुसीनतरन हीने दुसरं तर पंजाबच्या मानवीर कौरनं तिसरं स्थान पटकावलं. त्यांनी अनुक्रमे 11.53 सेकंद आणि 12.28 सेकंद वेळ नोंदवली.

इटलीतील नापोलीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये द्युतीनं 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यावेळी द्युतीनं 11.32 सेकंदाची वेळ नोंदवली होती. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली महिला धावपटू ठरली होती.

द्युती चंदने आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. तीने 11.28 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावलं होतं. आगामी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी तिचा सराव सुरू आहे.

SPECIAL REPORT: पुण्याकडे जाणारा सगळ्यात जवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद, व्यवसायासह पर्यटनाला फटका

Published by: Suraj Yadav
First published: August 17, 2019, 11:35 AM IST
Tags: athletes

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading