विरानुष्काला 'ड्युरेक्स'नं दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

विरानुष्काला 'ड्युरेक्स'नं दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

विराट-अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपल्या ब्रँडची जाहिरातही करता येईल या हिशोबाने त्यांनी विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

14 डिसेंबर : विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 3 दिवस झाले पण त्यांच्याविषयीच्या चर्चा आणि जोक्स काही थांबता थांबत नाहीयेत. अख्ख्या सोशल मीडियावर त्यांच्या नावाने जोक्स आणि शुभेच्छांचा पाऊस पडतोय.अशाच शुभेच्छा ड्युरेक्स इंडियानेही दिल्या आणि ते सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल झाले.

विराट-अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपल्या ब्रँडची जाहिरातही करता येईल या हिशोबाने त्यांनी विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. अहो,असं आम्ही नाही लोक म्हणतायत.

 

ड्युरेक्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून विरानुष्काला शुभेच्या देताना लिहिलं की,'तुमच्या नात्यात कोणालीही येऊ देऊ नका.' ड्युरेक्सच्या या ट्विटने अवघ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. त्याच्यावर अनेकांनी उत्तरं देत ड्युरेक्सची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

First Published: Dec 14, 2017 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading