S M L

दक्षिण आफ्रिकेला धक्का, या धडाकेबाज फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती

एबी डिव्हिलीएयर्सच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक झटका

Updated On: Mar 15, 2019 08:22 PM IST

दक्षिण आफ्रिकेला धक्का, या धडाकेबाज फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती

केपटाऊन, 15 मार्च: दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर आणि डावखुरा फलंदाज जे. पी. ड्युमिनी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलीएयर्सने निवृत्ती घेतली होती. क्रिकेट मंडळाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ड्युमिनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र तो आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये यापुढेही खेळत राहणार आहे.

"गेल्या काही महिन्यात मला नवीन काही संधी मिळाल्या आहेत, त्या संधी पुर्ण करण्याकडे आता माझा भर असेल, मात्र क्रिकेट सोडण्याचा निर्णय अजिबात सोपा नव्हता, पण आता कुटुंबाला मी पहिले प्राधान्य देणार आहे. एवढी वर्ष मला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो", अशी भावूक पोस्ट जे.पी. ड्युमिनीने ट्विटरवर केली.Loading...


सध्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात पाच एकदिवसीय सामने सुरु आहेत, त्यातील शेवटचा सामना शनिवारी केपटाऊन येथे होणार आहे. हा सामना घरच्या मैदानावरचा जे पी ड्युमिनीचा शेवटचा सामना ठरणार आहे. ड्युमिनीने आतापर्यंत 193 एकदिवसीय सामन्यात 5047 धावा केल्या आहेत. तर, आपल्या चपलक गोलंदाजीच्या जोरावर ड्यमिनीने 68 विकेट्स घेतल्या आहेत. 2013ला नेदरलँड विरोधात ड्युमिनीने 122 बॉलमध्ये 150 धावा केल्या होत्या, ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मात्र, गेली 10 वर्ष विविध संघांकडून आयपीएल खेळणाऱ्या ड्युमिनीला यंदाच्या आयपीएला मुकावे लागणार आहे, कारण मुंबईच्या संघाने ड्युमिनीला संघात स्थान दिले नाही. ड्युमिनी राजस्थानकडून शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. तर, आता शनिवारी स्वत:च्या घरच्या मैदानावर ड्युमिनी शेवटचा सामना खेळेल.


VIDEO : एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 08:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close