कॅप्टन कुल धोनीच्या घरी कित्येक दिवस लाईटच नाही, रागात साक्षी म्हणाली...

कॅप्टन कुल धोनीच्या घरी कित्येक दिवस लाईटच नाही, रागात साक्षी म्हणाली...

विजपुरवठा खंडित होणे, हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. मात्र आता ही समस्या काही प्रसिध्द सेलिब्रिटींना सहन करावी लागत आहे.

  • Share this:

रांची, 20 सप्टेंबर : विजपुरवठा खंडित होणे, हे भारतीयांसाठी काही नवीन नाही. मात्र आता ही समस्या काही प्रसिध्द सेलिब्रिटींना सहन करावी लागत आहे. असेच काहीसे घडले भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये गेले कित्येक दिवस वीज नसल्यामुळे नागरिक हैरान झाले आहेत.

दरम्यान, महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) या सगळ्या प्रकरणाचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला. गुरुवारी ट्वीट करत साक्षीनं, रांचीतील सर्व नागरिक दररोजच्या वीज कपातीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले.

साक्षीनं या ट्वीटमध्ये, “दररोज 4 ते 7 सात वीज कपात होत आहे. गेल्या पाच तासांपासून घरांत वीज नाही. आज हवामानही चांगले आहे, आज कोणता सणही नाही. संबंधितांकडून लवकरात लवकर ही समस्या सोडवली जाईल अशी आशा आहे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-धोनीच्या पत्नीच्या HOT फोटोंमुळे धिंगाणा, बेबीपासून लव्ह यूपर्यंत कमेंट्स!

व्हारयल ट्वीटमुळे घेतली दखल

साक्षीचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, उर्जा वितरण निगम लिमिटेडने यावर उत्तर दिले. ठाकूर गावाजवळ नवीन सब स्टेशन तयार होत आहे. त्यामुळे 33 केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात आल्याने विजपुरवठा रोखण्यात आला. त्यामुळे काही भागातील विजपुरवठा 7 तासांपासून खंडित करण्यात आला. याबाबत माहितीही जाहीर करण्यात आली असल्याचे उर्जा वितरण निगम लिमिटेडकडून सांगण्यात आले.

वाचा-'धोनीची वेळ संपली, हकालपट्टीपूर्वी निवृत्तीचा सामना खेळवा'

धोनीच्या निवृत्तीची चर्चा

दुसरीकडे, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर मैदानावर दिसलेला नाही. विंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तो उपलब्ध नाही. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय धोनीचा आहे असं म्हटलं आहे. धोनीने 2014-15 मध्ये अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वन डे आणि टी20 क्रिकेट धोनी खेळतो आहे. माहीला नेहमीच धक्कातंत्र आवडतं. कोणी कल्पना केली नसेल अशा वेळी अचानक मोठा निर्णय जाहीर करण्याची धोनीची सवय आहे. 2014-15 मध्ये धोनीने असंच अचानक ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू असताना मध्येच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 2017 मध्ये धोनीने लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये कर्णधारपदही असचं अचानक सोडलं होतं. त्यामुळे आता धोनी कधी निवृत्ती घेणार याविषयी चर्चा सुरू आहेत.

वाचा-धोनी-रोहितमुळे विराटची चलती, गंभीरची बोचरी टीका

VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 07:43 PM IST

ताज्या बातम्या