मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Pakistan सीरिजची तयारी, ठिकाणही ठरलं, पण...

India vs Pakistan सीरिजची तयारी, ठिकाणही ठरलं, पण...

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2012-13 नंतर सीरिज झाली नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्स या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. भारत-पाकिस्तान जेव्हा आमने-सामने असतात तेव्हा क्रिकेटचा रोमांच वेगळ्या पातळीवर असतो, तसंच जगाचं लक्ष या मॅचवर लागलेलं असतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2012-13 नंतर सीरिज झाली नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट फॅन्स या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. भारत-पाकिस्तान जेव्हा आमने-सामने असतात तेव्हा क्रिकेटचा रोमांच वेगळ्या पातळीवर असतो, तसंच जगाचं लक्ष या मॅचवर लागलेलं असतं. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup) हेच दिसून आलं. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना जगभरात 16 कोटींपेक्षा जास्त लोकांनी बघितला. हा जगभरात सर्वाधिक पाहिला गेलेला टी-20 सामना ठरला. यानंतर आता दुबई क्रिकेट काऊन्सिलने (Dubai Cricket Council) भारत-पाकिस्तान सीरिजच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. भारत-पाकिस्तान सीरिज खेळवण्यासाठी आम्ही तयार असल्याचं दुबई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष अब्दुल रहमान फलकनाज यांनी सांगितलं आहे.

खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार फलकनाज म्हणाले,'भारत-पाकिस्तान सीरिज इकडे झाली तर चांगलंच आहे. आधी शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान मॅच व्हायच्या तेव्हा इथली परिस्थिती युद्धासारखी होती, पण खेळ याचा केंद्रबिंदू होता.' भारत-पाकिस्तान यांच्यातल्या खराब संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये सीरिज होत नाहीत. दोन्ही टीम फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात.

'राज कपूर एकदा आपल्या कुटुंबासोबत आले होते. अवॉर्ड नाईटवेळी त्यांनी माईक घेतला आणि शारजाहमध्ये भारत पाकिस्तान सामने किती शानदार होते. क्रिकेट लोकांना एकत्र आणतं, त्यामुळे हे असंच राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. आम्हालाही असंच करायंच आहे. जर भारत वर्षातून एक किंवा दोन वेळा पाकिस्तानविरुद्ध इकडे खेळणार असेल, तर हे खरंच शानदार असेल. आम्हाला क्रिकेट आणखी उत्कृष्ट करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आता फक्त बीसीसीआयच्या परवानगीची गरज आहे,' असं अब्दुल रहमान म्हणाले.

याशिवाय अब्दुल रहमान यांनी बीसीसीआयला आयपीएलच्या नियमित आयोजनाचं निमंत्रणही दिलं आहे. युएईमध्ये 2020 साली कोरोना काळात आयपीएलचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर यावर्षीही लीगचा दुसरा राऊंडही युएईमध्येच खेळवण्यात आला. तसंच बीसीसीआयने (BCCI) टी-20 वर्ल्ड कपचं आयोजनही युएई आणि ओमानमध्ये केलं होतं.

First published:

Tags: India vs Pakistan