मॅच फिक्सिंग : विराटच्या संघाचा ड्रमर अटकेत, बॉलरला दिलं होतं आमिष

आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाकडून ड्रम वाजवणाऱ्या ड्रमरने एका खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी ऑफर दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 10:15 AM IST

मॅच फिक्सिंग : विराटच्या संघाचा ड्रमर अटकेत, बॉलरला दिलं होतं आमिष

बेंगळुरू, 03 ऑक्टोबर : क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी आणि एका खेळाडूला मॅच फिक्सिंगसाठी ऑफर दिल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका ड्रमरला अटक केली आहे. त्या ड्रमरने 2019 च्या कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये एका खेळाडूला बेकायदेशीरपणे प्रस्ताव दिला होता. तो अनेक स्पर्धांमध्ये ड्रमर म्हणून फ्रँचाइजीसोबत असतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाचा ड्रमर आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी ड्रमरचे नाव भावेश बाफना असं आहे. त्यानं आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या आरसीबीच्या संघाकडून ड्रम वाजवून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. त्याशिवाय तामिळनाडु प्रीमियर लीग आणि कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही होता.

भावेश बाफनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या एखा खेळाडूला सट्टेबाजांच्या सांगण्यावरून 10 धावा देण्यास सांगितलं होतं. याशिवाय आयपीएल कॉन्ट्रॅक्टचं आमिषही दाखवण्यात आलं. या प्रकऱणी दिल्लीतील सट्टेबाजाचा शोध सुरू आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच बाफनाने खेळाडूंना ऑफर दिली होती.

याआधी केपीएलमधील संघ मालक अश्फाक अली थारा यांना सट्टेबाजी प्रकरणी अटक केली आहे. बाफनाने बेल्लारी टस्कर्स संघीतील भावेश गुलेचा गोलंदाजाला खराब कामगिरी करण्यास सांगितलं होतं. मात्र, भावेश गुलेचाने ही ऑफर धुडकावून लावली आणि तक्रार दाखल केली. बाफनाने त्याला दोन लाख रुपये आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचं आमिष दिलं होतं.

Loading...

आम्हालाही भावना आहे? मेधा कुलकर्णींचं भावुक UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...