मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL2023 : दुसरा डबल हेडर आज, रोहित-विराट आमने-सामने

IPL2023 : दुसरा डबल हेडर आज, रोहित-विराट आमने-सामने

 आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शनिवार प्रमाणे आज रविवारीसुद्धा डबल हेडर होणार आहे.

आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शनिवार प्रमाणे आज रविवारीसुद्धा डबल हेडर होणार आहे.

आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शनिवार प्रमाणे आज रविवारीसुद्धा डबल हेडर होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शनिवार प्रमाणे आज रविवारीसुद्धा डबल हेडर होणार आहे. पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि गतउपविजेता संघ राजस्थान रॉयल्स यांच्यात आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात असेल.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. तर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.

भारताच्या माजी क्रिकेटपटूची कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या ८८व्या वर्षी निधन

राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातला सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे. तर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना साडे सात वाजता खेळला जाईल. दोन्ही सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. याशिवाय डबल हेडर सामने असल्याने याचे प्रसारण स्टार गोल्डवरही पाहता येईल. आय़पीएलमधील सर्व सामने जिओ सिनेमा एपवर फ्री पाहता येतील. तसंच जवळपास १२ भाषांमध्ये या सामन्यांची कमेंट्रीही ऐकण्याची सुविधा असणार आहे.

रोहित शर्मा खेळणार का?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलमधील कर्णधारांच्या फोटोशूटसाठी उपस्थित नव्हता. तब्येत बरी नसल्यानं तो उपस्थित राहू शकला नव्हता असं म्हटलं जात आहे. आता तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबद्दल मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी खुलासा केला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2023