नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची (rahul dravid) निवड झाल्यापासून क्रिकेट जगतात एक वेगळंच वातावरण निर्माण झाले आहे. सर्व स्तरातुन त्याचे कौतुक होत असतानाच भारताचा माजी कर्णधार अजय जडेजाने (Ajay Jadeja) खास आपल्या शैलीत द्रविडच्या निवडीवरुन बीसीसीआयची (BCCI) कान टोचणी केली आहे.
एका स्पोर्ट्स न्यूज चॅनेलशी बोलताना जडेजाने राहुल द्रविडच्या या निवडीवर प्रतिक्रिया दिली आहे. द्रविडला मोकळेपणाने काम करू द्या असा सल्ला जडेजाने दिला आहे.
तो म्हणाला, तुम्हाला प्रशिक्षकांकडून बऱ्याच अपेक्षा असतात, परंतु शिस्त व समर्पण याही दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. राहुल द्रविड की निवड समिती हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे. द्रविडनं मिळवलेल्या यशाबद्दल तिळमात्र शंका नाही, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर बसते, तेव्हा तुम्ही त्याला त्याचं काम करू न दिल्यास किंवा त्याच्या दूरदृष्टीचा वापर न केल्यास, सारं काही व्यर्थ ठरेल. मग असा तर कोणीही प्रशिक्षक बनेल. अशी भावना जडेजाने व्यक्त केली.
तसेच तो पुढे म्हणाला, राहुल द्रविडसारखं मोठं नाव जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून निवडता, तेव्हा किमान त्याला त्याच्या दृष्टीकोनानं काम करू द्या. की, राहुल द्रविड या पदावर असेल, तर त्याच्या दूरदृष्टीला वाव द्या. संघाला कसं मार्गदर्शन करायचं हे, त्याला सांगू नका. अशी विनंती बीसीसीआयला त्याने केली आहे.
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने भारत अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघांसोबत काम केले आहे. यादरम्यान, त्याने केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर वरिष्ठ संघासाठी अनेक महान खेळाडूही घडवले आहेत. ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन या खेळाडूंनी भारत अ आणि अंडर-19 क्रिकेटमध्ये द्रविडच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचा मार्गदर्शन करणार आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर आता मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी द्रविडकडे असणार आहे, अशी घोषणा बुधवारी बीसीसीआयनं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.