युवराज सिंगविरोधात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल

युवराज सिंगविरोधात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल

युवराज सिंग आणि त्यांच्या कुटुंबावर घरगुती हिंसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजची वहिनी आकांक्षा शर्माने हा गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शर्मा ही बिग बॉस 10मध्ये स्पर्धक होती.

  • Share this:

18 आॅक्टोबर : टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि त्यांच्या कुटुंबावर घरगुती हिंसेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजची वहिनी आकांक्षा शर्माने हा गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शर्मा ही बिग बॉस 10मध्ये स्पर्धक होती.

आकांक्षाची वकील स्वाती सिंग मलिक हिच्या सागंण्यानुसार 'आकांक्षाचा पती जोरावर सिंग, सासु शबनम सिंग आणि दीर युवराज सिंग यांच्याविरूद्ध घरगुती हिंसाचाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या खटल्याची पहिली सुनावणी 21 ऑक्टबरला होणार आहे'.

युवराजची आई शबनम सिंग यांनी मध्यंतरी आकांक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांनी लग्नातले सगळे दागिने आणि इतर वस्तू परत मागितल्या होते.

पण यामुळे युवराज सिंगवर गुन्हा का असा सवाल विचारला असता स्वाती म्हणाली की, 'घरगुती हिंसाचार म्हणजे शारीरिक हिंसा नाही, त्याचा अर्थ मानसिक आणि आर्थिक छळ करणे हा सुद्धा आहे.' त्यामुळे युवराज सिंगलाही हा गुन्हा लागू होतो. जेव्हा आकांक्षासोबत चुकीचं होत होतं तेव्हा युवराज ते शांतपणे बघत राहिला. जेव्हा जोरावर आणि त्याच्या आईने आकांक्षावर मुलांसाठी दबाव आणला होता तेव्हा युवराजही त्यांच्यात सामील होता, असंही स्वाती म्हणाली.

आकांक्षाची सासू नेहमी रागात असते. जोरावर आणि युवराजच्या प्रत्येक गोष्टींमध्ये तिचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे आकांक्षा शर्माने युवराज आणि त्याच्या कुटुंबार घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 03:40 PM IST

ताज्या बातम्या