फिका पडला विराट-अनुष्काचा हॉट लुक, सोशल मीडियावर चर्चा फक्त झिवाची!

फिका पडला विराट-अनुष्काचा हॉट लुक, सोशल मीडियावर चर्चा फक्त झिवाची!

झिवाच्या गोड व्हिडीओ पुढे फिके पडले टीम इंडियाचे स्टार खेळाडू.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं की फराळ, रोशनाई आणि आनंदमय वातावरण. अशाच आनंदमयी वातावरणात सारा देश असताना भारतीय क्रिकेट संघही या सेलिब्रेशनमध्ये मागे नाही. सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दिवाळीनिमित्त भारतीय संघाच्या खेळाडूंनी आपल्या परिवारासोबत दिवाळी दणक्यात साजरी केली. यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर. सभ्यसाचीनं डिजाईन केलेल्या लुकमुळं कोहली कपल हॉट दिसत होते. विराट आणि अनुष्कानं आपल्या या फोटोंसह सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र सध्या सोशल मीडियावर कोहली कपलपेक्षा झिवाच्या व्हिडीओची सर्वात जास्त चर्चा आहे. धोनी सध्या आपल्या रांची येथील फॉर्महाऊसवर दिवाळी साजरी करत आहे. त्यानिमित्तानं धोनीच्या घरी रोषणाई करण्यात आली होती. यात झिवानं आपल्या गोड अंदाजात सर्वांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

Happy Diwali !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठीमध्ये सर्वांना दिवाळीच्या शभेच्छा दिल्या. तर बांगलादेश विरोधात टी-20चा कर्णधार होणाऱ्या रोहित शर्मानं आपली पत्नी आणि मुलीसोबत दिवाळी साजरी केली.

याशिवाय उमेश यादव, जसप्रीत बुमराह यांनीही आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी केली.

View this post on Instagram

✨ Happy Diwali ✨

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

दरम्यान, फक्त भारतीय खेळाडूंनीच नाही तर परेदशी खेळाडूंनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय विदेशी फुटबॉल लीगमध्येही असे घडले. तर, इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल)च्या चॅम्पियन मॅंचेस्टर सिटीनं भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या