नवी दिल्ली, 07 एप्रिल : एकीकडं आयपीएलचं ज्वर वाढत असताना, दर दिवशी काही तरी नवीन घडतचं असते. आयपीएलचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही चाहते आहेत. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची दखल सगळेच घेत आहेत. या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग मुलगा शानदार गोलंदाजी करताना दिसत आहे. गल्लीत क्रिकेट खेळत असताना हा मुलगा आपल्या एका हातानं गोलंदाजी करताना दिसत आहे.
Doesn’t stop him from playing cricket. pic.twitter.com/9Z7F9lUych
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) April 1, 2019
भारतीय क्रिकेटर ऋद्धिमान साहा यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ऋद्धिमाननं या मुलाला कोणी क्रिकेट खेळण्यापासून रोखू शकत नाही. या व्हिडिओमध्ये हा दिव्यांग मुलगा आपल्या एका हातानं गोलंदाजी करत आहे. खास गोष्ट म्हणजे, हा बॉल थेट स्टॅम्पवर जाऊन आदळला.
या मुलाच्या गोलंदाजीवर भारताचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा चांगलाच अचंबित झाला आहे. ऋद्धिमान भारतासाठी विकेटकिपर म्हणून खेळतो. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची जागा रिषभ पंतनं घेतली आहे.
VIDEO: चड्डी-बनियान गँगचा पेट्रोल पंपावर दरोडा; दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद