Home /News /sport /

दिनेश कार्तिक दिसणार क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटमध्ये, निवड झालेला एकमेव भारतीय

दिनेश कार्तिक दिसणार क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटमध्ये, निवड झालेला एकमेव भारतीय

टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) लवकरच क्रिकेटच्या वेगळ्या फॉरमॅटमध्ये दिसणार आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या 'द हंडरेड' (The Hundred) या स्पर्धेत कार्तिक कॉमेंट्री करेल. इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) या स्पर्धेचं आयोजन करत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 एप्रिल : टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) लवकरच क्रिकेटच्या वेगळ्या फॉरमॅटमध्ये दिसणार आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या 'द हंडरेड' (The Hundred) या स्पर्धेत कार्तिक कॉमेंट्री करेल. इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) या स्पर्धेचं आयोजन करत आहे. स्काय स्पोर्ट्सवर हे सगळे सामने दाखवले जाणार आहेत. एखाद्या क्रिकेट लीगमध्ये कार्तिक पहिल्यांदाच कॉमेंट्री करणार आहे. याआधी भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्येही कार्तिक स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये होता, त्यामुळे त्याला आता द हंडरेड लीगसाठी निवडण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये केव्हिन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड, कुमार संगकारा, वसीम अक्रम, डॅरेन सॅमी, एन्ड्रयू फ्लिंटॉफ यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या खेळाडूंसह स्काय स्पोर्ट्सचे स्थायी कॉमेंटेटर नासीर हुसेन, डेव्हिड लॉईड, मार्क अथर्टन, मार्क बुचर हेदेखील असतील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या टीम मालकांनाही द हंडरेडमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या सगळ्या 8 टीमना प्रत्येकी 25 टक्के भागीदारी द्यायची ऑफर देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांनीही या ऑफरमध्ये रस दाखवला आहे. तसंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने द हंडरेडसाठी विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) जर सहभागी झाले तर टीव्ही राईट्स द्यायचीही ऑफर दिली आहे. पण बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. द हंड्रेड म्हणजेच 100 बॉलची एक इनिंग असलेली ही स्पर्धा जुलै-ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणेच 8 फ्रॅन्चायजी असतील. प्रत्येक फ्रॅन्चायजीमध्ये एक महिला आणि एक पुरुष टीम असेल. 100 बॉलच्या या स्पर्धेत 10 बॉलची एक ओव्हर असेल. कर्णधाराला वाटलं तर तो दोन बॉलरकडून 5-5ओव्हर टाकू शकेल. याआधी ही स्पर्धा 2020 साली खेळवली जाणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा थांबवण्यात आली. द हंड्रेडच्या सगळ्या मॅच स्काय स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या