नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy Final) तामिळनाडूने कर्नाटकवर (Tamil Nadu vs Karnataka) रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयानंतर विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik ) ट्विट करत 2 वर्षापूर्वीच्या आठवणी जागवल्या आहेत.
कर्नाटकने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयसाठी 16 रनची गरज होती, पण प्रतीक जैनने या ओव्हरमध्ये दोन वाईड बॉल टाकले, तसंच साई किशोरने एक फोर आणि शाहरुखने दोन सिक्स मारत मॅच तामिळनाडूच्या दिशेने फिरवली.शेवटच्या बॉलला 5 रनची गरज असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) सिक्स मारत तामिळनाडूला लागोपाठ दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून दिली.
यानंतर कार्तिकने ट्विट केले आणि 2 वर्षापूर्वीचा किस्सा लक्षात आणून दिला. ''दोन वर्षांपूर्वी अंतिम सामना शेवटच्या चेंडूवरच हरला होता. आता त्याच विरोधी संघासमोर विजयाची नोंद करणे, ते ही शेवटच्या चेंडूवर खरोखरच महान आहे. कर्नाटकने स्पर्धेत चांगला खेळ केला आणि विजेतेपद राखल्याबद्दल तामिळनाडूचे अभिनंदन.'' अशा आशयाचे ट्विट कार्तिकने केले आहे.
1 डिसेंबर 2019 रोजी सुरत येथे झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकने शेवटच्या चेंडूवर तामिळनाडूचा 1 धावेने पराभव केला. त्या सामन्यात कर्नाटकने 20 षटकात 5 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडू संघाला 6 गडी गमावून 179 धावा करता आल्या. दिनेश कार्तिक त्यावेळी तामिळनाडूचा कर्णधार होता आणि विजय शंकर, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हेही संघात खेळत होते.
181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावाच्या शेवटच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर विजय शंकर बाद झाला, त्यानंतर मुरुगन अश्विन शेवटच्या चेंडूवर केवळ 1 धावच करू शकला. यामुळे तामिळनाडूचा संघ हा सामना 1 धावाने हरला आणि ट्रॉफी मिळवता आली नाही. तामिळनाडूने 19 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या.
शेवटच्या षटकात त्याला विजयासाठी 13 धावांची गरज होती. रविचंद्रन अश्विन आणि विजय शंकर क्रीजवर होते आणि कृष्णप्पा गौतम गोलंदाजीसाठी आला होता. अश्विनने पहिल्या दोन चेंडूत चौकार मारले. पुढच्या 2 चेंडूत फक्त 1 धाव झाली आणि विजय शंकर स्ट्राईकवर आला. विजय शंकर 5 व्या चेंडूवर धावबाद झाला. त्यानंतर मुरुगन अश्विन फलंदाजीला आला आणि त्याने शेवटच्या चेंडूवर केवळ 1 धाव घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Tamilnadu