दिनेश कार्तिकनं मागितली बिनशर्त माफी, BCCIने पाठवली होती नोटीस

दिनेश कार्तिकनं मागितली बिनशर्त माफी, BCCIने पाठवली होती नोटीस

भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला त्याच्या एका चुकीमुळे तुझ्यासोबतचा करार रद्द का करू नये असा प्रश्न विचारत नोटीस पाठवली होती.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं शाहरुख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्सच्या ड्रेसिंगरुममध्ये हजेरी लावल्याबद्दल बीसीसीआयची बिनशर्त माफी मागितली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सामन्यावेळी त्यानं बीसीसीआच्या केंद्रीय कराराचं उल्लंघन केलं होतं.

कार्तिकनं त्याच्या उत्तरात म्हटलं आहे की, तो प्रशिक्षक ब्रॅडॉन मॅक्युलमच्या विनंतीवरून पोर्ट ऑफ स्पेनला गेला होता. त्याच्या सांगण्यावरून टीकेआरची जर्सी घातली. त्यानं पत्रात म्हटलं की, मी यासाठी बीसीसीआयची परवानगी न घेतल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. मी टीकेआरच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालो नव्हतो.

वाचा : धोनीच्या निवृत्तीवर कुंबळेचा निवड समितीला सल्ला, पंतच्या खेळाबद्दल म्हणाला...

कार्तिक म्हणाला की, मी इतर सामन्यात टीकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये बसणार नाही. कार्तिकच्या या माफीनाम्यानंतर बीसीसीआय़ हे प्रकरण मिटवू शकते. कार्तिकचा बीसीसीआयसोबत केंद्रीय करार आहे. त्यामुळं आयसीसी आणि आयपीएल वगळता कोणत्याही लीगमध्ये त्याला खेळता येत नाही. हा नियम सर्व फर्स्ट क्लासमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना लागू होतो.

ती आली... तिनं जिंकलं, दिग्गज टेनिसस्टारला धक्का देत 19 वर्षीय बियांकानं पटकावलं विजेतेपद

VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

Published by: Suraj Yadav
First published: September 8, 2019, 3:05 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading