Deodhar Trophy : 'कार्तिकची ‘चित्त्याची चाल’! कॅचचा VIDEO पाहून तुम्ही धोनीलाही विसराल

Deodhar Trophy : 'कार्तिकची ‘चित्त्याची चाल’! कॅचचा VIDEO पाहून तुम्ही धोनीलाही विसराल

चित्त्यासारखी कार्तिकनं केली पार्थिव पटेलची शिकार, पाहा हा VIDEO.

  • Share this:

रांची, 4 नोव्हेंबर : जगातला सर्वात यशस्वी विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. त्यात धोनीची स्टम्प मागची कामगिरी सर्वांना ज्ञात आहे. मात्र आज दिनेश कार्तिकनं आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांन मागे टाकले आहे. देवधर ट्रॉफीध्ये कार्तिकनं तुफानी कामगिरी केली. त्याचा कॅच पाहून तुम्हाला धोनीचाही विसर पडेल.

देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कार्तिकनं धोनीसारखी चित्त्या सारखी उडी लगवली. हा कॅच पाहून तुम्हालाही धक्का बसेल. रांचीमध्ये कार्तिकनं इंडिया सीकडून खेळताना इंडिया बीचा कर्णधार पार्थिव पटेलचा उत्कृष्ठ झेल घेतला. इशान पोरेलच्या (Ishan Porel) शानदार चेंडूवर पार्थिवच्या बॅटची कडा लागली आणि कार्तिकनं हा जबरदस्त कॅच पकडला. पार्थिव पटेल (Parthiv Patel) फक्त 14 धावा करत बाद झाला.

34 वर्षीय कार्तिकनं पोरेलच्य चेंडूवर डाईव्ह मारत हवेत एका हातानं कॅच घेतला. या अविश्वसनीय कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या सामन्यातील कार्तिकच्या कॅचचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. एका चाहत्यानं हा झेल पाहून लोक म्हणतील की त्याचे वय झाले आहे. त्याचा काळ संपला आहे. मात्र खरतर 2007 सारखाच आजही दिनेश कार्तिक पक्षाप्रमाणे हवेत उडू शकतो.

वाचा-नव्या ‘विराट’ पर्वाला सुरुवात, युवा खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम

आज झालेल्या अंतिम सामन्यात इंडियानं बीनं प्रथम फलंदाजी करत 283 धावांपर्यंत मजल मारली. यात केदार जाधवनं 86 धावांची तुफानी खेळी केली. तर, इंडिया सीकडून इशान पटेलनं पाच विकेट घेतल्या. मात्र इंडिया बीनं दिलेल्या आव्हाना पाठलाग करताना इंडिया सीला 50 ओव्हरमध्ये केवळ 232 धावा करता आल्या.

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

शुबमन गीलनं मोडला विराटचा विक्रम

भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गीलची ओळख (Shubamn Gill) भारतीय संघाचे भविष्य म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये शुबमन गील खोऱ्यानं धावा काढत आहे. त्यामुळं त्याला भारतीय कसोटी संघातही जागा मिळाली आहे. दरम्यान आता शुबमन गीलनं एक विक्रमी कामगिरी केली आहे. गीलनं चक्क कर्णधार विराट कोहलीच्या एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. शुबमन गीलकडे देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी संघाचे कर्णधारपद होते. सर्वात कमी वयात देवधर ट्रॉफीमध्ये कर्णधार झालेला गील पहिला खेळाडू आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीनं 2009-10मध्ये 21व्या वर्षी देवधर ट्रॉफीच्या फायनलमध्ये नेतृत्व केले होते. याबाबत आता दिल्लीचा उन्मुक्त चंद तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता 20व्या वर्षी शुबमन गील कर्णधार झाला आहे.

वाचा-पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 4, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या