मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पत्नीच्या अफेअरमुळे कोलमडून पडला, आत्महत्याही करावीशी वाटली; दीपिकामुळे नैराश्यातून बाहेर आला दिनेश कार्तिक

पत्नीच्या अफेअरमुळे कोलमडून पडला, आत्महत्याही करावीशी वाटली; दीपिकामुळे नैराश्यातून बाहेर आला दिनेश कार्तिक

दिनेश-दीपिका काही महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांचे आई-बाबा बनले आहेत

दिनेश-दीपिका काही महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांचे आई-बाबा बनले आहेत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) एक नवं रूप पाहायला मिळतंय. यंदा कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरंनं त्याला दिलेली फिनिशरची भूमिका तो चोख पार पाडतो आहे. आज तो यशाच्या शिखरावर असला तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याने अनेक चढउतार पाहिले आहेत.

पुढे वाचा ...

  dinमुंबई, 22 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) एक नवं रूप पाहायला मिळतंय. कार्तिकच्या जोरदार बॅटिंगनं आरसीबी संघाला उत्तम कामगिरी करता आली आहे. यंदा कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरंनं (RCB) फिनिशरची भूमिका दिलीये आणि तो ती भूमिका चोख पार पाडतोय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आरसीबीच्या आत्तापर्यंतच्या चारही विजयात कार्तिकचा महत्त्वाचा वाटा आहे. दिनेश कार्तिकच्या चांगल्या खेळीच्या जोरावर आरसीबी पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम असून या संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. या आयपीएलमध्ये कार्तिकने सात सामन्यांत 210 धावा केल्या असून तो एकदाच आऊट झालाय. त्याचा स्ट्राईक रेटही 200 पेक्षा जास्त आहे.

  खेळाडूच्या कामगिरीच्या मागे त्याचं कुटुंब असतं. तसंच दिनेश कार्तिकच्या मागेही त्याचं कुटुंब आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या दिनेशचं खासगी आयुष्य आता सावरलं आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर दिसत आहे. त्याची कारकीर्द आणि खासगी आयुष्याबाबतच जाणून घेऊया.

  कार्तिकची टीम इंडियात एंट्री

  दिनेश कार्तिकने 2004 साली भारतासाठी पहिला सामना खेळला होता. त्यानंतर तो संघात आत-बाहेर होत राहिला, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची उत्कृष्ट कामगिरी कायम राहिली. 2004 च्या अखेरीस धोनीला भारतीय संघात संधी देण्यात आली. यादरम्यान काही निवडकर्त्यांना कार्तिकला संधी द्यायची होती, मात्र धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर धोनीने अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियात आपले स्थान पक्के केले. धोनी 2007 मध्ये कर्णधार झाल्यानंतर कार्तिक त्याचा पर्याय बनला, धोनी टीमबाहेर असताना कार्तिक टीम इंडियात विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळायचा. यादरम्यान दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता, मात्र धोनी टीममध्ये असल्यामुळे त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याला सातत्याने टीममधून वगळले जात होते. परंतु, त्याला तमिळनाडूच्या रणजी संघाचा कॅप्टन बनवण्यात आले आणि त्याची टीम रणजीमध्ये चांगली खेळी करत होती.

  हे वाचा-IPL 2022 : संकटातील मुंबई इंडियन्ससाठी सचिनची बॅटींग, टीमला दिला खास मंत्र!

  मैत्रिणीशी लग्न अन् घटस्फोट

  कार्तिकने 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत लग्न केलं. मात्र, काही काळानंतर कार्तिकच्या पत्नीचं क्रिकेटर मुरली विजयसोबत अफेअर सुरू झालं. एके दिवशी निकिताने ती मुरली विजयच्या बाळाची आई होणार असून, घटस्फोट हवा आहे असं कार्तिकला सांगितलं. दोघांचा घटस्फोट झाला आणि लग्न मोडल्यानंतर कार्तिक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळला. अचानक आयुष्यात आलेल्या वादळाने उध्वस्त झाला, त्याचं मन कोणत्याही कामात गुंतत नव्हतं. त्याने क्रिकेटचा सराव बंद केला, जिमला जाणं सोडलं आणि एकटा राहायला लागला.

  डिप्रेशनमुळे तमिळनाडूचं कर्णधारपद गेलं

  कार्तिकचे लग्न मोडल्यानंतर त्याचा फॉर्म सतत खराब होत गेला आणि त्याच्याकडून तमिळनाडूचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं. ज्याच्यासाठी निकिताने कार्तिकला सोडलं तोच मुरली विजय टीमचा नवा कर्णधार झाला. त्याची भारतीय संघातही निवड झाली आणि बराच काळ विजय टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियासाठी खेळला. पण दुसरीकडे कार्तिक मात्र डिप्रेशनमध्ये गेला. बायको आणि खेळ दोन्ही गेले, त्याला काहीच समजत नव्हतं आणि तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिलंय.

  ट्रेनरच्या आग्रहाने बदललं आयुष्य

  पूर्णपणे खचलेल्या कार्तिकने सर्व ट्रेनिंग आणि जिम सोडल्याचे त्याच्या ट्रेनरच्या लक्षात आलं. त्यामुळे तो कार्तिकच्या घरी गेला. घरात पसारा पडून होता आणि बाजूलाच कार्तिक मोठी दाढी वाढवून बसला होता. त्याच्या ट्रेनरने त्याला पुन्हा जिम सुरू करण्यास सांगितलं. तोच ट्रेनर त्याच जिममध्ये स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकललाही (Deepika Pallikal) ट्रेनिंग देत होता. याच जिममध्ये कार्तिक आणि दीपिका एकमेकांना भेटले आणि त्यांचे आयुष्य बदलले. दीपिका ट्रेनरसोबत मिळून कार्तिकशी बोलू लागली आणि त्याला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत केली.

  हे वाचा-बॉक्सर माईक टायसनचा राग अनावर, विमानात सहप्रवाशाची केली धुलाई! पाहा VIDEO

  दीपिकाच्या मदतीने गमावलेला फॉर्म परत मिळवला

  दीपिकाची साथ मिळाल्यानंतर कार्तिक पुन्हा त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आणि त्याच्या बॅटमधून पुन्हा रन्स येऊ लागले. त्याची बॅट तळपली आणि पुन्हा भारताच्या वनडे टीममध्ये कार्तिकची निवड झाली. आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सचं (KKR) कॅप्टन करण्यात आलं. कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता टीम चांगली खेळली पण ते चॅम्पियन बनू शकले नाही. याच दरम्यान 2015 मध्ये दीपिका आणि कार्तिकनं लग्न केलं. दुसरीकडे कार्तिकच्या जागी मॉर्गनला केकेआरचा कॅप्टन बनवण्यात आलं. यावेळी कार्तिक इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फक्त आयपीएल खेळण्याचा विचार करत होता. कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा अडचणी आल्या, पण यावेळी दीपिका त्याच्यासोबत होती. याचदरम्यान, दीपिका गरोदर राहिली आणि तिने स्क्वॉश खेळणं बंद केलं. काही महिन्यांपूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

  दीपिकाच्या मदतीनं घेतलं स्वप्नातलं घर

  दिनेश कार्तिकचे पोएस गार्डनमध्ये घर घेण्याचे स्वप्न होते, परंतु ते खूप महाग होतं. आई झाल्यानंतर दीपिकानं कार्तिकला हिंमत दिली. दोघं पुन्हा मेहनत करू आणि खेळून पैसे कमावल्यानंतर स्वप्नातलं घर घेऊ, असं ती कार्तिकला म्हणाली. दीपिकाने मुलांच्या जन्मानंतर स्क्वॉश खेळायला सुरुवात केली आणि कार्तिकने पुन्हा ट्रेनिंग सुरू केलं. इंटरनॅशनल क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्तीचा विचार सोडला आणि कॉमेंट्रीमध्येही हात आजमावला, इथेही तो सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी पोएस गार्डनमध्ये स्वप्नातलं घरही घेतलं. धोनीला वाटायचं की मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने कार्तिकला विकत घ्यावं, जेणेकरून त्याच्या जाण्यानंतर टीमकडे चांगला विकेटकीपर असेल, पण आरसीबीने त्याला विकत घेतलं. आता आरसीबीकडून कार्तिक उत्कृष्ट खेळतोय.

  First published:

  Tags: Ipl 2022, Kolkata, Love story, RCB