मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टीममधील हा दिग्गज खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?

टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टीममधील हा दिग्गज खेळाडू करणार निवृत्तीची घोषणा?

तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे याचा फायदा संघाला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. अशातच संघामधील एक दिग्गज खेळाडू भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप खेळेल, असं म्हटलं जातंय.

तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे याचा फायदा संघाला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. अशातच संघामधील एक दिग्गज खेळाडू भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप खेळेल, असं म्हटलं जातंय.

तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे याचा फायदा संघाला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. अशातच संघामधील एक दिग्गज खेळाडू भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप खेळेल, असं म्हटलं जातंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 साठी भारतीय संघ जोरात तयारी करत आहे. या वर्ल्ड कपची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची तयारीही पूर्ण झाली आहे. या वेळी निवडकर्त्यांनी टीममध्ये तरुण आणि अनुभवी प्लेअर्सना संधी दिली आहे. त्यामुळे याचा फायदा टीमला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. अशातच टीममधील एक दिग्गज खेळाडू भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप खेळेल, असं म्हटलं जातंय. या खेळाडूचं नाव आहे दिनेश कार्तिक. दिनेश टी-20 वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलंय.

निवडकर्त्यांनी 37 वर्षांच्या दिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी दिली आहे. कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी करत टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं, तेव्हापासून त्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. तो अप्रतिम खेळतोय, त्याच्या धडाकेबाज बॅटिंगने प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सच्या चिंतेत भर टाकलीय. दिनेश टीम इंडियासाठी सर्वांत मोठा मॅच विनर ठरला आहे.

दिनेश आता 37 वर्षांचा झालाय. तो भारतीय टीममधील सर्वांत जास्त वय असलेला खेळाडू आहे. तब्बल तीन वर्षांनी तो भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलाय. त्याचं एक स्वप्न पूर्ण झालंय, त्यामुळे आता तो टीमचा भाग असताना भारताने वर्ल्ड कप जिंकावा, हे स्वप्नही पूर्ण व्हावं, अशी कार्तिकची इच्छा असेल. कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी ऋषभ पंत टफ फाईट देतोय, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतर कार्तिक आंतराराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्त होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

हे वाचा - वर्षभरात 5 टी20, वर्ल्ड कपमधूनही आऊट, बुमराचं स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणजे नक्की काय?

दिनेश कार्तिक खालच्या फळीत तुफानी बॅटिंग करतोय, हाच त्याचा प्लस पॉइंट आहे. सुरुवातीचे प्लेअर्स आऊट झाले असतील तरी कार्तिक असल्याने भारत मॅच जिंकेल, अशी आशा चाहत्यांच्या मनात असते. कार्तिक कोणत्याही आक्रमक बॉलर्सच्या बॉलवर तुफान फटकेबाजी करू शकतो, तसंच तो उत्कृष्ट विकेटकीपर आहे. साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये त्याने सलग दोन बॉलमध्ये फोर आणि सिक्स ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.

हे वाचा - टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला किती बक्षिस मिळतं? ICC नं जाहीर केली माहिती

2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात दिनेश कार्तिक होता. कार्तिक भारतीय टीमसाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने भारतासाठी 26 टेस्ट मॅचेसमध्ये 1026 रन्स, 94 वन-डे मॅचेसमध्ये 1752 रन्स आणि 51 टी-20 मॅचेसमध्ये 598 धावा केल्या आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 cricket, T20 world cup 2022