कार्तिक होणार 'बेस्ट फिनिशर', तुफान फटकेबाजीने गोलंदाजांना घाम

कार्तिक होणार 'बेस्ट फिनिशर', तुफान फटकेबाजीने गोलंदाजांना घाम

भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर असून विजय हजारे ट्रॉफीत तामिळनाडुचं नेतृत्व करताना बेस्ट फिनिशरची भूमिका बजावत आहे.

  • Share this:

जयपुर, 14 ऑक्टोबर : विजय हजारे ट्रॉफीत तामिळनाडुने अभिनव मुकुंद आणि विजय शंकर यांच्या खेळीच्या जोरावर शनिवारी मध्य प्रदेशला 211 धावांनी पराभूत केलं. तामिळनाडुचा हा सलग 8 वा विजय आहे. या सामन्यात मुकुंदने 139 चेंडूत 17 चौकार आणि दोन षटकारांसह 147 धावा केल्या. तर शंकरने 93 चेंडूत 90 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तामिळनाडुचा कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकनं 28 चेंडूत वेगवान खेळी साकारली. त्याने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय मध्यप्रदेशचा कर्णधार नमन ओझाला महागात पडला. तामिळनाडुचा सलामीवीर मुरली विजय पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 4 चौकारांसह 20 चेंडूत 24 धावा केल्या. गेल्या सामन्यात नाबाद शतक करणारा बाबा अपराजितही या सामन्यात 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र तामिळनाडुच्या मुकुंद-शंकर जोडीनं 191 धावांची भागिदारी केली. मुकुंदनं लिस्ट ए मध्ये 12 वं शतक साजरं केलं तर विजय शंकरनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलं. त्याचं यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीतील हे तिसरं अर्धशतक आहे.

विजय शंकर बाद झाला तेव्हा 42 षटकांत तीन बाद 241 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दिनेश कार्तिकनं तुफान फटकेबाजी केली. अखेरच्या 52 चेंडूत तामिळनाडुने तब्बल 119 धावा कुटल्या. कार्तिकनं 232 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 10 चेंडूत 1 षटकारासह 17 धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. त्याने पाच सामन्यात 4 अर्धशतकं केली असून या सर्व सामन्यात त्यानं 40 पेक्षा जास्त झाला केल्या आहेत. यामध्ये दोन डावात त्यानं 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कार्तिकने आतापर्यंत 52*(52), 95(91), 97(62), 40(23), 65*(28) अशा धावा केल्या आहेत. त्याने 116.3 च्या सरासरीने आणि 136 च्या स्ट्राइकनं 349 धावा केल्या आहेत.

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

First published: October 14, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading