Home /News /sport /

IND vs SA: हार्दिक पांड्याचा एक सल्ला आणि दिनेश कार्तिकनं 16 वर्षांनी रचला इतिहास

IND vs SA: हार्दिक पांड्याचा एक सल्ला आणि दिनेश कार्तिकनं 16 वर्षांनी रचला इतिहास

सामनावीर दिनेश कार्तिक (55 धावा) याने 16 वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक झळकावले, आवेश खान (18 धावांत 4 बळी) याच्या शानदार कामगिरीमुळे भारताने 82 धावांनी विजय मिळवला.

    नवी दिल्ली, 18 जून : राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20I मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही रणनीती आखली आणि त्याचा परिणाम दिसून आला. सामनावीर दिनेश कार्तिक (55 धावा) याने 16 वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक झळकावले, आवेश खान (18 धावांत 4 बळी) याच्या शानदार कामगिरीमुळे भारताने 82 धावांनी विजय मिळवला. आता 19 जून रोजी बंगळुरू येथे होणारा पाचवा टी-20 सामना निर्णायक होणार आहे. युवा कर्णधार ऋषभ पंत सामन्यानंतर म्हणाला, "आम्ही रणनीतीबद्दल बोललो आणि निकाल तुमच्यासमोर आहे." कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांच्यातील भागीदारीबद्दल बोलताना पंत म्हणाला, "खरोखरच मी खूष आहे, कारण दोघांच्या फलंदाजीने आफ्रिकन गोलंदाजांवर दबाव दिसत होता. हार्दिक पांड्याच्या सल्ल्याने कार्तिकचा खेळ बदलला - सामनावीर दिनेश कार्तिक म्हणाला, “खूप छान वाटत आहे. शेवटच्या सामन्यात परिस्थिती चांगली चालली नव्हती. पण आता मी परिस्थितीचे अधिक चांगल्या पद्धतीने आकलन करू शकलो आहे. हे नियोजन आणि अनुभवातून येतं. कार्तिक म्हणाला, “त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे आमचे सलामीवीर चालले नाहीत. मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा हार्दिकने मला क्रीजला चिकटून राहण्याचा सल्ला. आमची योजना यशस्वी झाली." हे वाचा -  भारताच्या माजी क्रिकेटपटूंना किती पेन्शन मिळते? असे आहेत BCCI चे स्लॅब हार्दिक पांड्यानेही 31 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंमध्ये 5 व्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे भारताने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 169 धावा केल्या. हे वाचा -  विराट-बाबर आता एकाच टीमकडून खेळणार! प्रत्येक वर्षी होणार सीरिज 'पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना चुका झाल्या' दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (08 धावा) निवृत्त झाला होता, त्यामुळे त्याच्या जागी आलेल्या केशव महाराज याने बोलताना सांगितले, "फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये चुका झाल्या होत्या. आम्ही वारंवार अंतराने विकेट गमावल्या. गोलंदाजी करताना आम्ही शेवटच्या पाच षटकांमध्ये जास्त धावा दिल्या. रविवारी होणारा पुढील सामना महत्त्वाचा असेल, चुका टाळाव्या लागतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Hardik pandya

    पुढील बातम्या