मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'आता तिघांचे पाच झालो'; दिनेश कार्तिकने चाहत्यांना दिली Good News

'आता तिघांचे पाच झालो'; दिनेश कार्तिकने चाहत्यांना दिली Good News

दिनेश कार्तिकने मुलांचे Photos शेअर केले आहेत. पाहा काय ठेवली आहेत नावं...

दिनेश कार्तिकने मुलांचे Photos शेअर केले आहेत. पाहा काय ठेवली आहेत नावं...

दिनेश कार्तिकने मुलांचे Photos शेअर केले आहेत. पाहा काय ठेवली आहेत नावं...

मुंबई, 28 ऑक्टोबर : क्रिकेटर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचं रिअर लाइफमध्ये प्रमोशन झालं आहे. त्याला जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. याबाबत स्वत: दिनेश कार्तिकने आपण बाबा झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्याची पत्नी दीपिका पल्लिकल (Dipika Pallikal), भारतासाठी स्क्वॅश खेळते.

दिनेश कार्तिकच्या आनंदाला सध्या पारावार उरला नाही. त्याने काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. त्याने आपली पत्नी, जुळी मुलं आणि डॉगीचा फोटो शेअर केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आम्ही तिनाचे पाच झालो. त्याने आपल्या दोन्ही मुलांची नावेदेखील त्याने चाहत्यांना सांगितली आहेत. त्यांनी आपल्या एका मुलाचं नाव कबीर पल्लिकल कार्तिक आणि दुसऱ्याचं नाव जियान पल्लिकल कार्तिक ठेवलं आहे. म्हणजे मुलांच्या आडनावात आई आणि वडील दोघांच्या नावाला समावेश आहे. (Dinesh Karthik gave good news to the fans)

हे ही वाचा-'5 मिनिटांमध्ये इंग्रजी संपेल', अफगाणिस्तानच्या कॅप्टनचा मजेशीर VIDEO VIRAL

KKR ने कार्तिकला दिल्या शुभेच्छा..

दिनेश कार्तिक बाबा झा्यानंतर IPL फ्रेंचाइजी कोलकाता नाइट राइडर्सनेदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ट्विट करून लिहिलं आहे की, आमच्या KKR कुटुंबात दोन नवीन सदस्य सामील झाल्यामुळे कुटुंब अधिक मोठं झालं आहे.

2015 मध्ये झालं होतं लग्न..

भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लिकल यांचं 2013 मध्ये साखरपुडा झाला होता. यानंतर दोघांनी 2015 मध्ये हिंदू पद्धतीने लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षांनंतर आता त्यांना जुळी मुलं झाली आहे. दीपिका ही दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी पहिली पत्नी निकितासोबत त्यांनी 2012 मध्ये घटस्फोट झाला होता.

दिनेश कार्तिक भारतासाठी 26 टेस्ट, 94 वनडे आणि 32 T20 इंटरनेशनल सामने खेळला आहे. ज्यात त्यांनी 3000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यांनी भारतासाठी शेवटची मॅच 2019 मध्ये खेळली होती. IPL मध्ये खेळलेल्या 200 हून अधिक सामन्यात त्यांनी 4000 हून अधिक धावा केल्या आहेत.

First published:

Tags: Cricket news