Home /News /sport /

वयाच्या 10व्या वर्षीच 'या' खेळाडूने Olympics मध्ये केली होती एन्ट्री; रेकॉर्ड आजही कायम

वयाच्या 10व्या वर्षीच 'या' खेळाडूने Olympics मध्ये केली होती एन्ट्री; रेकॉर्ड आजही कायम

या वर्षी जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 119 खेळाडूंसह 228 सदस्यांचं पथक पाठवण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 16 जुलै : टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपली आहे. 2020 साली ही स्पर्धा होणार होती, पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकल्यामुळे आता 23 जुलै 2021 पासून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. अद्यापही कोरोनाचा धोका कमी झाला नसल्यामुळे या स्पर्धांना प्रेक्षकांची उपस्थिती नसेल. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकबाबतच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ या. रोमन सम्राट थिओडिसीयसने 1500 वर्षांपूर्वी ऑलिम्पिक खेळांवर बंदी घातली होती. त्यानंतर 1896मध्ये ही स्पर्धा सुरू करण्यात आली. हीच पहिली आधुनिक ऑलिम्पिक (Modern Olympics) स्पर्धा मानली जाते. ग्रीस देशाची राजधानी असलेल्या अथेन्स शहरात ही स्पर्धा झाली होती (Athens Olympics). ग्रीक लोकांचा उत्साह आणि जगभरातून आलेले खेळाडू यामुळे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली; पण आधीच्या परंपरेप्रमाणेच या स्पर्धेमध्ये केवळ पुरुष खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. यानंतर 1900 साली झालेल्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपासून मात्र महिला खेळाडूंचाही सहभाग दिसू लागला. (First Olympics with women) 6 ते 15 एप्रिल 1896 दरम्यान झालेल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 14 देशांमधील 241 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये ग्रीसचा जिम्नॅस्ट दिमित्रोस लाँड्रास हा सर्वांत कमी वयाचा ऑलिम्पिक खेळाडू ठरला. (Youngest Olympic player) अवघ्या दहा वर्षांच्या या खेळाडूने पॅरालल बार्स स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं. सर्वांत कमी वयाचा ऑलिम्पिकपटू हा त्याच्या नावावरचा विक्रम कायम आहे. ‘आज तक’ने याबद्दलची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. IND vs SL : पहिल्या वनडेमध्ये अशी असणार टीम इंडियाची Playing XI! पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मैदानी खेळ, सायकलिंग, जलतरण स्पर्धा, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, कुस्ती, तलवारबाजी, नेमबाजी आणि टेनिस अशा 43 खेळ प्रकारांचा समावेश होता. अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना सुवर्णपदकाऐवजी रौप्य पदक (Silver Medal) देण्यात आलं होतं. रौप्य पदकासह ऑलिव्ह वृक्षाची फांदी आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्यपदक आणि कल्पवृक्षाची फांदी व प्रमाणपत्र देण्यात आलं. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला चक्क रिकाम्या हातांनी परत जावं लागलं होतं. या स्पर्धेमध्ये बऱ्याच विशेष गोष्टी घडल्या होत्या. मॅरेथॉन स्पर्धेवेळी जवळपास निम्मे खेळाडू अर्ध्यातूनच स्पर्धा सोडून परतले. ग्रीसच्या स्पायरिडन लुई याने ही स्पर्धा जिंकली. जलतरण स्पर्धेवेळी खेळाडूंना बोटीतून तलावाच्या मधोमध नेण्यात आलं आणि तिथून पोहत पुन्हा किनाऱ्यावर येण्यास सांगितलं गेलं होतं. अमेरिकेचे खेळाडू जेम्स कोनोली हे ट्रिपल जम्प स्पर्धेत जिंकून पहिले ऑलिम्पिक चॅम्पियन ठरले. जर्मनीच्या कार्ल शुमान यांनी जिम्नॅस्टिक आणि कुस्तीच्या चार स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक मिळवला. त्या काळी कुस्तीला रोमन नियम लागू होते. तसंच वजन आणि वेळेची कोणतीही मर्यादा नव्हती. या वर्षी जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून 119 खेळाडूंसह 228 सदस्यांचं पथक पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंतचं हे सर्वांत मोठं पथक असणार आहे.
    First published:

    Tags: Olympic

    पुढील बातम्या