News18 Lokmat

विराटला टीममध्ये घेतलं म्हणून मला बाहेर काढलं,दिलीप वेंगसरकरांचा गौप्यस्फोट

मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2018 11:22 PM IST

विराटला टीममध्ये घेतलं म्हणून मला बाहेर काढलं,दिलीप वेंगसरकरांचा गौप्यस्फोट

08 मार्च : बद्रीनाथ ऐवजी विराट कोहलीला टीममध्ये घेतलं म्हणून मला बाहेर काढला असा गौप्यस्फोट   भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.

दोन वर्षे भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ही जबाबदारी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती. तेव्हा ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा होत असे. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे संघ खेळत. त्यात आम्ही २३ वर्षांखालील संघ घेऊन जायचे ठरवले. तेव्हा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकलो होतो. त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला आम्ही त्या स्पर्धेसाठी निवडले. त्यात विराटने १२३ धावांची नाबाद खेळी केली होती. विराटमध्ये निश्चितच काहीतरी आहे, याची खात्री पटली. म्हणून श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात विराटची निवड करण्याचे आम्ही ठरवले. त्याचा तिथे कस पाहता येईल, अशी अपेक्षा होती. संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होते. तेव्हा बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते. ते तामिळनाडूचे अध्यक्षही होते.

मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले. पण ते तडकाफडकी के. श्रीकांतला घेऊन तत्कालिन बोर्ड अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. श्रीकांत हा त्यानंतर निवड समिती अध्यक्ष झाला होता असा गौप्यस्फोट दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं ज्येष्ठ क्रीडा पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कारानंतर झालेल्या मुलाखतीत वेंगसरकर यांनी बीसीसीआयमधील लॉबिंगबाबतचा गौप्यस्फोट केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2018 11:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...