मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'या गोष्टी हैराण करणाऱ्या', वेंगसरकरांचे गांगुलीवर प्रश्नचिन्ह

'या गोष्टी हैराण करणाऱ्या', वेंगसरकरांचे गांगुलीवर प्रश्नचिन्ह

टीम इंडिया (Team India) 3 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, पण त्याआधी दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी सौरव गांगुली (Sourav Ganguly) अध्यक्ष असलेल्या बीसीसीआयवरच (BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 31 मे : टीम इंडिया (Team India) 3 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होईल. या मॅचनंतर दीड महिना भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल, पण या वेळापत्रकावरून भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी निशाणा साधला आहे. दिलीप वेंगसरकर यांनी सौरव गांगुली (Sourav Ganguly) अध्यक्ष असलेल्या बीसीसीआयवरच (BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. क्रिकेटनेक्स्टसोबत वेंगसरकर बोलत होते. 'हे वेळापत्रक बघून हैराण झालो. अशाप्रकारे एखाद्या दौऱ्याचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं? तुम्ही दीड महिने क्रिकेट खेळणार नाही, त्यानंतर टेस्ट सीरिज कशी खेळणार? पाकिस्तान आणि श्रीलंका जुलै महिन्यात मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी इंग्लंडला जाईल. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर दीड महिना तिकडे काय करणार आहे? या कालावधीमध्ये त्यांनी काऊंटी मॅच खेळल्या पाहिजे. दीड महिना खूप जास्त कालावधी आहे. एवढ्या दिवसानंतर तुम्ही अचानक टेस्ट सीरिज खेळायला सुरुवात कराल तर वेगळंच वाटेल,' असं वेंगसरकर म्हणाले. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज 2007 साली जिंकली होती, त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा कर्णधार होता, तर वेंगसरकर निवड समितीचे अध्यक्ष होते. यानंतर भारत इंग्लंडमध्ये तीन टेस्ट सीरिज खेळला. या तीन टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 0-4, 1-3 आणि 1-4 ने पराभव केला. 2018 साली विराटच्याच नेतृत्वात भारताचा इंग्लंडमध्ये पराभव झाला होता.
First published:

Tags: Cricket news, India vs england, Team india

पुढील बातम्या