विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

टीम इंडियातून पुन्हा होणार मोठे बदल. रोहितकडे जाऊ शकते टी-20चे कर्णधारपद.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्ष करण्यात आले. दरम्यान आता आणखी एक महत्त्वाच्या पदावर बदल करण्यात येणार आहे. सध्या भारताच्या मुख्य निवड समितीवर असलेले एमएसके प्रसाद यांचा कार्यकाल संपला असून त्यांच्याजागी एका खास क्रिकेटपटूची निवड करण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबरला निवड समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळं दिलीप वेंगसरकर यांची निवड झाल्यास युवा खेळाडूंना संघात जास्तीत जास्त स्थान दिले जाऊ शकते.

मीडिया रिपोर्टनुसार एमएसके प्रसाद यांच्या जागी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची नियुक्ती केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे याआधी वेंगसरकर निवड समितीचे प्रमुख राहिले आहेत. त्यातच जर वेंगसरकर निवड समितीच्या प्रमुख पदी आल्यास पहिला धक्का हा विराट कोहलीला बसू शकतो. विराट सध्या टी-0, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे. त्यामुळं दिलीप वेंगसरकर टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद रोहितकडे देऊ शकतात. रोहित शर्मा पहिल्यापासूनच वेंगसरकर यांचा आवडता खेळाडू राहिला आहे.

एवढेच नाही तर 2008मध्ये विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते, त्यावेळी निवड समितीवर दिलीप वेंगसरकर होते. त्यामुळं वेंगसरकर यांच्या आग्रहाखातीर विराटला संघात स्थान देण्यात आले होते. विराट सध्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे, त्यामुळं त्याच्यावरचा भार कमी करण्यासाठी रोहितकडे टी-20ची जबाबदारी दिली जाऊ शकते.

असे आहेत रोहितचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड

वेंगसरकर आणि रोहित यांचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत. एवढेच नाही तर रोहित लवकरच टी-20चा कर्णधारही होऊ शकतो. याचे कारण म्हणजे रोहितचे कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगले आहे. रोहितनं कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी 10 सामने खेळले आहेत. यातील 8 सामने भारतानं जिंकले आहे. रोहितचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये जिंकण्याचा रेकॉर्ड 80.00% आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतानं फक्त 2 सामने गमावले आहेत.

रोहितचे रेकॉर्ड विराटपेक्षा चांगले

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं 15 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 12 सामने भारतानं जिंकले आहेत तर तीन सामन्यात पराभव सहन करावा लागला. तर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं 27 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 16 सामने भारतानं जिंकले आहेत तर 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. विराटची जिंकण्याची आकडेवारी ही 61.53% आहे तर रोहितची 80.00% आहे. त्यामुळं या आकडेवारीचा फायदाही रोहितला होऊ शकतो.

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या