Home /News /sport /

दिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल!

दिलीप वेंगसरकरांनी वांद्र्यात घेतलं आलिशान घर, किंमत पाहून चक्रावून जाल!

दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) 1983 वर्ल्ड कपच्या विजयी भारतीय टीमचे सदस्य होते, यानंतर त्यांची टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख म्हणूनही कारकिर्द गाजली.

    मुंबई, 26 जुलै : दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) 1983 वर्ल्ड कपच्या विजयी भारतीय टीमचे सदस्य होते, यानंतर त्यांची टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख म्हणूनही कारकिर्द गाजली. आपल्या रोखठोक मतांसाठी कायमच चर्चेत असणारे दिलीप वेंगसरकर आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या (Dilip Vengsarkar Foundation) माध्यमातून ट्रस्टी दिलीप वेंगसरकर यांनी वांद्रे पश्चिममध्ये कल्पतरू स्पार्कल या इमारतीमध्ये 10 व्या मजल्यावर घर घेतलं आहे. या घराची किंमत 6.05 कोटी रुपये आहे, असं वृत्त स्क्वेअरफीट इंडिया या वेबसाईटने दिलं आहे. 16 जुलै रोजी हे डिल झालं. वांद्र्याच्या एमआयजी कॉलनीमध्ये ही इमारत आहे. इंडेक्स टॅपला दिलेल्या कागदपत्रांनुसार या प्रॉपर्टीसाठी 30.25 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आली. हे घर 120.44 स्क्वेअर मीटर म्हणजेत 1,296 स्क्वेअर फूट एवढं आहे. विक्रेत्याने या घरासाठी त्याचा बडोद्याचा पत्ता दिला आहे. या घरासह वेंगसरकर फाऊंडेशनला बेसमेंटमध्ये कार पार्किंगसाठी दोन जागा देण्यात आल्या आहेत. वरळी समुद्र किनाऱ्याजवळ वेंगसरकरांचं स्पोर्ट्सफिल्ड अपार्टमेंटमध्येही एक घर आहे. या व्यवहाराबद्दल स्क्वेअरफूट इंडियाने वेंगसरकरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सेलिब्रिटींच्या घरांच्या अवाढव्य किंमती याआधी मे 2021 साली रोहित शर्माने त्याचा लोणावळ्याचा बंगला 5.25 कोटी रुपयांना विकला होता. हा बंगला 6,329 स्क्वेअर फुटाचा होता. अजय देवगणने डिसेंबर 2020 साली जुहूमध्ये 47.5 कोटी रुपयांचा बंगला विकत घेतला होता. तर अमिताभ बच्चन यांनी अंधेरीमध्ये 31 कोटी रुपयांचं डुप्लेक्स घर घेतलं. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने जुहूमध्ये नव्या घरासाठी 39 कोटी रुपये मोजले. अमिताभ बच्चन यांच्याच बिल्डिंगमध्ये सनी लिओनीने 16 कोटी रुपयांचं घर घेतलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Mumbai, Property

    पुढील बातम्या