'रोहितसाठी देश महत्त्वाचा की IPL?' हिटमॅनच्या त्या निर्णयावर भडकले दिग्गज क्रिकेटपटू

'रोहितसाठी देश महत्त्वाचा की IPL?' हिटमॅनच्या त्या निर्णयावर भडकले दिग्गज क्रिकेटपटू

याआधी दुखापतीमुळे रोहित शर्मा चार सामन्यांना मुकला होता. एवढेच नाही तर त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळण्यात आले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : आयपीएलमध्ये (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजही मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव घेतले जाते. रोहित शर्मा सध्या दुखापतीनं ग्रस्त आहे. फिट नसूनही रोहित शर्मा मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मैदानात उतरला. याआधी दुखापतीमुळे रोहित शर्मा चार सामन्यांना मुकला होता. एवढेच नाही तर त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळण्यात आले आहे. मात्र मंगळवारी झालेल्या सामन्यात मैदानात उतरत रोहितनं सगळ्यांता पेचात टाकलं. रोहितच्या या निर्णयावर मात्र दिग्गज क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी प्रमुख भडकले आहेत.

याआधी रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाचते, जर तो फिट असेल तर नक्की त्याचा विचार होईल, असे मत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं व्यक्त केले होते. मात्र तरी रिस्क घेत हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित मैदानात उतरला. टॉसच्यावेळी रोहितनं स्वत: त्याची हॅमस्ट्रिंगची दुखापत अजून बरी झाली नसल्याचे सांगितले होते. यावर बीसीसीआयने माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी रोहितवर टीका केली आहे.

वाचा-India vs Australia : '...तरच रोहित शर्माला टीम इंडियात जागा', ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी गांगुलीचं मोठं विधान

वेंगसरकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्माला काही दिवसांपूर्वी फिजिओ नितिन पटेल यांनी अनफिट घोषित केले होता. त्यामुळे रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जागा मिळाली नाही. मात्र तोच खेळाडू मुंबईकडून आयपीएल खेळत आहे, टीमचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे रोहितसाठी देश महत्त्वाचा आहे की IPL?

वाचा-India vs Australia : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, या दिवशी होणार डे-नाइट टेस्ट

रोहितवर केली टीका

वेंगसरकर यांनी रोहितच्या हैदराबादविरुद्ध सामन्यात खेळण्याच्या निर्णयावर टीका केली. रोहितसाठी क्लब जास्त महत्त्वाचा आहे की देश? बीसीसीआय यावर कारवाई करणार आहे का? की बीसीसीआयनं रोहितच्या दुखापतीची तपासणी चुकीची केली? असे प्रश्न आता समोर आले आहेत. याआधी बीसीसीआयच्या फिजिओनं रोहितला 2 आठवडे विश्रांती घेण्यास सांगितले होते.

वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर

भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा

पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी

दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी

तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा

पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा

दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी

तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी

पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड

दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न

तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी

चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन

Published by: Priyanka Gawde
First published: November 4, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या