धक्कादायक! महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन

धक्कादायक! महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन

Hand of God म्हणून प्रसिद्ध असणारा महान फूटबॉलपटू मॅराडोनाच्या (Maradona) निधनाच्या बातमीने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे

  • Share this:

ब्युनोस एयर्स: अर्जेंटिनाचे महान फूटबॉलपटू डियागो मॅरडोना यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या झटक्यामुळे मॅरडोना यांचा त्यांच्या घरी टिगरमध्ये मृत्यू झाला आहे. 30 ऑक्टोबरला मॅरडोना यांच्या डोक्यात झालेल्या रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या होत्या. मॅरडोना यांची टीम गिमनासिया यांनी पॅटरानटोचा 3-0 ने पराभव केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात करण्यात आलेल्या स्कॅनिंगनंतर मॅरडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचं निधन झालं. वयाच्या 60व्या वर्षी मॅरडोना यांनी अखेरचा श्वास घेतला.

अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एयर्सजवळ असलेल्या ला प्लेटा इथल्या रुग्णालयात मॅरडोना यांना नेण्यात आलं.अर्जेंटिनातल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मॅरडोना यांची प्रकृती सुधारत होती, पण अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 21 वर्षांच्या कारकिर्दीत मॅरडोना यांच्यासाठी 1986 हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. याच वर्षी मॅरडोना यांनी अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. 1986 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला बाहेर काढण्यासाठी मॅरडोना यांनी केलेला गोल आजही 'हॅण्ड ऑफ गॉड' या नावाने प्रसिध्द आहे.

First published: November 25, 2020, 10:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading