मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

''मी खेळण्यास सक्षम नाही...' कॅच सोडल्यानंतर पाकिस्तानच्या हसन अलीने व्यक्त केली खंत

''मी खेळण्यास सक्षम नाही...' कॅच सोडल्यानंतर पाकिस्तानच्या हसन अलीने व्यक्त केली खंत

Hasan Ali

Hasan Ali

गतवर्षी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 नोव्हेंबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यातील एक किस्सा समोर आला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा हसन अलीच्या (Hasan Ali) मनात अजूनही त्या गोष्टीची खंत आहे.

  मुंबई, 24 एप्रिल: भारतीय क्रिकेट टीम (Team India) आयपीएलच्या 15 व्या सिझननंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका विरूद्ध सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयनं शनिवारी या टी20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या मालिकेची सुरूवात 9 जून रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, गतवर्षी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 नोव्हेंबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यातील एक किस्सा समोर आला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा हसन अलीच्या (Hasan Ali) मनात अजूनही त्या गोष्टीची खंत आहे. टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाज हसन अलीने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. ज्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबियावरही भरपूर टीका झाली होती. आता या प्रकरणी हसन अलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. IPL 2022 : सचिनच्या वाढदिवसाचं मुंबई इंडियन्समध्ये सेलिब्रेशन, अर्जुननं दिल्या खास शुभेच्छा! VIDEO
  हसन अली (Hasan Ali) सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप 2022 मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो लंकाशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने मॅथ्यू वेडचा (Matthew Wade Catch) झेल सोडण्याच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात माझ्या हातून झेल सुटल्यानंतर कित्येक रात्र मला वाईट स्वप्ने पडली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी संघाला खाली पाडल्यामुळे मला खूप वाईट वाटत होते. मला माहिती नाही की, मी तो झेल कसा आणि का सोडला होता. असा प्रश्न सारखा मनात उपस्थित होत होता. खासकरून एक व्यक्ती आणि एका संघाच्या रूपात आम्ही क्षेत्ररक्षणाचे खूप कठिण प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ही चूक पचवणे फारच अवघड होते. पण एका प्रोफेशनल क्रिकेटपटूच्या रूपात मला माहिती आहे की, अशा गोष्टी घडत असतात. यापूर्वीही माझ्याकडून असे काही झेल सुटले आहेत. त्यामुळे हे ठीक आहे. असेही त्याने यावेळी म्हटले. हसन अलीची टी20 विश्वचषकातील कामगिरी हसन अली हा पाकिस्तान संघाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. या 27 वर्षीय गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 49 सामने खेळताना 60 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी 20 विश्वचषक 2021 मध्ये (T20 World Cup 2021) ६ सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Pakistan, Pakistan Cricket Board

  पुढील बातम्या