इम्रान खान तिसऱ्यांदा करतोय लग्न?

'बुशरा बीबीं'शी त्याने लग्न केल्याच्या चर्चांना पाकिस्तानात उधान आलं आहे.

'बुशरा बीबीं'शी त्याने लग्न केल्याच्या चर्चांना पाकिस्तानात उधान आलं आहे.

  • Share this:
07 जानेवारी : इम्रान खाननं पुन्हा बोहल्यावर चढलाय का? सध्या क्रिकेट जगत आणि पाकिस्तानमध्ये हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानमधल्या वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार इम्रान खानने पुन्हा लग्न केलं असल्याच्या चर्चा आहेत. 'बुशरा बीबी'शी त्याने लग्न केल्याच्या चर्चांना पाकिस्तानात उधान आलं आहे. इम्रान खान हा पाकिस्तान-तहरिक-ए-इन्साफचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. पण मंडळी या अफवा जर खऱ्या असतील तर इम्रान खानचं हे तिसरं लग्न असेलं. इम्रान खानचं पहिलं लग्न ब्रिटनच्या जेमिमा गोल्डस्मिथशी झालं होतं. लग्नानंतर जेमिमानी इस्लाम स्विकारला होता. २००४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. दुसरं लग्न पत्रकार रेहाम खानशी झालं होतं. पण त्याचं हेही लग्न फार काळ टिकलं नाही. काही महिन्यातचं दोघेही वेगळे झाले. आणि आता काय परत त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत चर्चा आहेत. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे आता खुद्द इम्रानच सांगू शकेल.
First published: