धोनीला बदलावी लागणार आपली बॅट, पण का ?

धोनीला बदलावी लागणार आपली बॅट, पण का ?

या नव्या नियमांचा फटका फक्त धोनीलाच नाही तर डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल आणि पोलार्ड सारख्या मातब्बर फलंदाजांनाही बसणार आहे.

  • Share this:

19 जुलै: आपल्या तुफान फलंदाजीने आणि शानदार हेलिकॉप्टर शॉट्सने बॉलर्सला हैराण करणाऱ्या महेंद्र सिंग धोनीला आता त्याची बॅट बदलावी लागणार आहे. कारण एक ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नियमांनुसार 40 मिलिमीटरहून जास्त रूंदीची बॅट वापरता येणार नाही.

एक ऑक्टोबरपासून क्रिकेटचे काही नियम बदलणार आहेत. या नव्या नियमांचा फटका फक्त धोनीलाच नाही तर डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल आणि पोलार्ड सारख्या मातब्बर फलंदाजांनाही बसणार आहे. 40 एम.एम.हून जास्त रूंदी असलेल्या बॅटने शॉट्स मारणे फलंदाजांना सोपे जात असे. धोनीची बॅटही 45 एम.एम.हून जास्त रूंद आहे तर वॉनरची बॅट 50 एम. एम.हून जास्त रूंद आहे. त्यामुळे यांना आपल्या बॅट बदलाव्या लागणार आहे.

विराट कोहलीला मात्र बॅट बदलण्याची काही गरज नाही कारण त्याच्या बॅटची रूंदी 40 एम.एम.हून कमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading