धोनी खेळणार '300' वा एकदिवसीय सामना

300 एकदिवसीय सामने खेळणारा धोनी 6वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. भारत-श्रीलंका दरम्यान आज चौथा एकदिवसीय सामना होतोय. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात धोनीनं संघाला पराभूत होण्यापासून वाचवलंय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2017 12:12 PM IST

धोनी खेळणार '300' वा एकदिवसीय सामना

31 ऑगस्ट: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याच्या कारकिर्दीतला 300वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे आज त्याच्या खेळावर सगळ्यांच्या नजरा असतील.

300 एकदिवसीय सामने खेळणारा धोनी 6वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. भारत-श्रीलंका दरम्यान आज चौथा एकदिवसीय सामना होतोय. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात धोनीनं संघाला पराभूत होण्यापासून वाचवलंय. त्यामुळे आजच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेलं. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत होणाऱ्या चर्चेला त्यानं आपल्या बॅटने उत्तर दिलंय.

सध्या चालू असलेली भारत-श्रीलंका मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारत आज काही नवीन खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.

३०० सामने खेळणारे भारतीय खेळाडू

-सचिन तेंडुलकर - ४६३

Loading...

-राहुल द्रविड - ३४४

-मोहम्मद अझरुद्दीन - ३४४

-सौरव गांगुली - ३११

-युवराज सिंग - ३०४

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...